Weight Loss: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बरेचसे लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. एकाच जागी तासनतास बसून काम करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा वाईट सवयी लोकांना लागल्या आहेत. यामुळे एकूण वजनाशी संबंधित समस्या वाढल्याचे लक्षात येते. भारतामध्ये असंख्य लोक स्थूलपणाचा सामना करत आहेत. वजन कमी व्हावे म्हणून लोक डाएटचा पर्याय निवडतात. वजन नियंत्रणामध्ये यावे याकरिता डाएटसह व्यायामदेखील आवश्यक असतो. दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचा समावेश केल्याने फिट राहायला मदत होते. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या वर्कआउटच्या प्रकाराची माहिती आम्ही देणार आहोत.
वेट लॉससाठी उपयुक्त असलेले व्यायामाचे प्रकार:
- दररोज किमान ३० मिनिटे धावल्याने शरीर योग्य शेपमध्ये राहण्यास मदत होते. असे केल्याने शरीरातील ५०० कॅलरीज बर्न होतात. या वर्कआउटची सुरुवात चालण्यापासून करावी. पुढे हळूहळू चालण्याचा वेग वाढवावा. नंतर धावायला सुरुवात करावी. असे केल्याने शरीरावर दबाव निर्माण होत नाही.
- वजन कमी करण्यासाठी स्टेप एक्सरसाइज (Step exercise) फायदेशीर ठरतो. हा फार सोपा व्यायाम आहे. घरातील पायऱ्यांवर चढ-उतार केल्याने चांगला व्यायाम होऊ शकतो. यासाठी कोणत्याही अतिरिक्त सामानाची गरज नसते.
- सायकल चालवणे (Cycling) हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. दिवसातून फक्त ३० मिनिटे सायकल चालवल्याने फिट राहायला मदत होते. यामुळे पायाच्या स्नायूंना बळकटी येते.
- वजन कमी करण्यासाठी पोहणे (Swimming) खूप आरोग्यदायी समजले जाते. पोहताना संपूर्ण शरीराची हालचाल होत असते. म्हणजेच शरीराच्या प्रत्येक भागाचा व्यायाम होत असतो. ३०-४० मिनिटे पोहण्याचा सराव केल्याने ५०० कॅलरीज सहज बर्न होतात.
आपण जे अन्नपदार्थ खातो, त्यामार्फत शरीरामध्ये कॅलरीज पोहचत असतात. यांचा वापर अनेक शारीरिक क्रियांमध्ये होत असतो. पण अतिरिक्त प्रमाणामध्ये कॅलरीज शरीरात गेल्याने चरबी वाढत जाते. परिणामी वजनावर नियंत्रण राहत नाही. कॅलरीज इनटेक आणि कॅलरीज बर्न होण्याचे प्रमाण यांवर नियंत्रण ठेवल्याने वजन कमी करणे सहज शक्य असते.