वजन वाढणं म्हणजे फक्त शरीर जड होणं नाही – ते मन, आत्मविश्वास आणि जीवनशैलीवरही खोल परिणाम करतं. शरीरावर साचलेली थुलथुल चर्बी, लटकलेला पोटाचा भाग आणि थकलेलं मन या सगळ्यामुळे माणूस स्वतःबद्दलच कमीपणाची भावना बाळगू लागतो.
तज्ज्ञ सांगतात की, वाढलेलं वजन डायबिटीज, हार्ट डिजीज, ब्लड प्रेशर आणि लिव्हर फॅट सारख्या गंभीर आजारांचं मुख्य कारण असू शकतं.

फिटनेस कोच राज गणपत (Raj Ganpath) यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं आहे की, वजन कमी करण्यासाठी लोक स्वतःवर अन्याय करतात – कधी जबरदस्ती डाएटिंग तर कधी अति व्यायाम. पण खरं तर वजन कमी करणं म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही, तर शरीराला समजून घेऊन जीवनशैलीत छोटे-छोटे बदल करणं आहे.

फिटनेस कोच राज गणपत यांचे ७ सोपे उपाय (7 Simple Ways to Lose Weight Naturally)

१️ )आठवड्यात ३–५ दिवस नियमित व्यायाम (Exercise 3–5 Days a Week)

राज गणपत सांगतात, “थकवणारा व्यायाम करून काही दिवसात दमछाक होईल आणि नंतर तोच व्यायाम सोडून द्याल.” हलका पण सातत्यपूर्ण व्यायाम वजन घटवण्याचा टिकाऊ मार्ग आहे. रोज १०,००० पावलं चालणं, थोडा स्ट्रेचिंग किंवा हलकी कार्डिओ एक्सरसाईज पुरेशी आहे.

२️)कार्बोहायड्रेट कमी करा, पण पूर्णपणे बंद करू नका (Cut Carbs, Don’t Eliminate)

कार्बोहायड्रेट हे शरीराचं ऊर्जेचं इंधन आहे. म्हणून साखर, मैदा, पिझ्झा, बर्गर हे रिफाइंड कार्ब्स टाळा; पण ओट्स, ब्राउन राईस, फळं आणि संपूर्ण धान्य आहारात ठेवा.

३)जंक फूडवर नियंत्रण (Limit Junk Food)

पॅकेज्ड स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रेंच फ्राईज यामध्ये ट्रान्स फॅट आणि सोडियम जास्त असतात.ते मेटाबॉलिझम कमकुवत करतात आणि चर्बी वाढवतात.
त्याऐवजी घरचं हेल्दी अन्न, नट्स, फळं, सॅलड खाण्याची सवय लावा.

४) भाज्यांचा आहारात भरपूर समावेश (Add More Vegetables)

भाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. लौकी, तोरई, गाजर, ब्रोकली, शिमला मिरची यांचा नियमित वापर केल्यास पोट भरलेलं राहतं आणि ओव्हरइटिंग टाळता येतं.

५) प्रोटीनयुक्त अन्न खा (Add Protein to Every Meal)

वजन घटवण्यासाठी आणि मसल्स टिकवण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक आहे.राज गणपत सांगतात – “प्रोटीन खाल्ल्याने शरीरात ऊर्जेचा पुरवठा स्थिर राहतो आणि भूक कमी लागते.” दही, पनीर, अंडी, चिकन, सोया, डाळी, नट्स हे उत्तम स्रोत आहेत.

६) झोप पूर्ण घ्या (Sleep Well)

रात्री किमान ७ ते ८ तासांची झोप शरीर आणि मेंदूच्या रिचार्जसाठी आवश्यक आहे.झोपेचा अभाव हार्मोनल बिघाड निर्माण करतो आणि भूक वाढवतो. त्यामुळे वजन वाढतं.

७) दररोज पुरेसं पाणी प्या (Drink Enough Water)

दररोज २–३ लिटर पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, मेटाबॉलिझम वाढतो आणि त्वचा उजळते.
सोडा, कोल्डड्रिंक्स याऐवजी साधं पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

वजन कमी करायचं म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही, तर शरीराला समजून घेणं आहे. थोडा संयम, सातत्य आणि शिस्त ठेवा — वजन कमी होईलच, पण मनही हलकं आणि आत्मविश्वासानं भरलेलं राहील.