What happens when you drink Clove lemon tea every day : हिवाळ्यात जास्त भूक लागते. तसेच बैठी जीवनशैली, ज्यामुळे अनेकदा वजन वाढते आणि अनेक पचनाच्या समस्या उद्भवतात. हिवाळ्यात वजन कमी करणे कठीण वाटू शकते; परंतु आपल्या नियमित पाण्यात किंवा हर्बल चहामध्ये योग्य घटक जोडल्याने प्रभावी वजन आणि एकूण आरोग्य व्यवस्थापनास मदत होऊ शकते. असाच एक हिवाळ्यातील उपाय म्हणजे लवंग-लिंबू चहा, जो त्याच्या शक्तिशाली आरोग्यदायी फायद्यांसह जळजळ कमी करणे आणि आरोग्य समस्या दूर करणे व वजन व्यवस्थापन यांसाठी ओळखला जातो. आज आम्ही तुम्हाला लवंग आणि लिंबू असलेल्या आरोग्यदायी चहाबद्दल सांगत आहोत, ज्याचं सेवन तुम्ही दररोज केलंत, तर शरीरातील होणारे बदल पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिंबू-लवंगाचा चहा का?

प्राचीन काळापासून लवंग आणि लिंबू दैनंदिन स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. त्यांच्या सुगंध, चव व अनोख्या चवीमुळे ते सर्वांनाच आवडतात. या दोन सामान्य स्वयंपाकघरातील घटकांचे मिश्रण आरोग्यसंवर्धन साधू शकते. जे नैसर्गिकरीत्या आरोग्य आणि निरोगीपणा सुधारण्यास मदत करू शकते. हिवाळ्यातील दैनंदिन आहारात लवंग-लिंबू चहाचा समावेश केल्याने नैसर्गिकरीत्या रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास, चयापचय आरोग्य सुधारण्यास, वजन कमी करण्यास मदत होऊ शकते आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते.

लवंगमध्ये पोषक घटक

लवंगमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, लोह व मॅग्नेशियमदेखील जास्त असते. शेवटी त्यांचे उच्च अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात. लवंगातील युजेनॉल हे हिरड्यांचे दुखणे कमी करणे, श्वास ताजेतवाना करणे व तोंडाच्या संसर्गाचा सामना करणे यांसाठी ओळखले जाते.

लवंगा जळजळ कमी करण्यास आणि संधिवात व सांधेदुखीची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. विषाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ म्हणून लवंग ओळखली जाते. तसेच लवंग दातदुखी, हिरड्यांचे संक्रमण व श्वासाची दुर्गंधी यांसाठी एक नैसर्गिक उपाय आहे. लवंग यकृताच्या कार्यास समर्थन देते.

दुसरीकडे लिंबूदेखील व्हिटॅमिन सी आणि अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्याशिवाय लिंबूमध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. या चहामध्ये लिंबाचा समावेश केल्याने पचन सुधारण्यास मदत मिळते आणि यकृताचे डिटॉक्सिफिकेशन होते. त्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास साह्य मिळते.

दररोज लवंग-लिंबू चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यातील आहारात लिंबू-लवंगाच्या चहाचा समावेश केल्याने अनेक प्रकारे एकूण आरोग्याला चालना मिळू शकते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

दररोज लवंग-लिंबू चहाचे सेवन रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवून रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत करते. नियमितपणे लवंग-लिंबू चहाचा आनंद घेतल्याने तुम्हाला सर्दी, फ्लू आणि इतर आजार होण्याचीही शक्यता कमी होते.

पचन सुधारते

चहामध्ये लवंग टाकल्याने निरोगी पचन होण्यास मदत होते. पोटातील सूज कमी करते आणि पोट फुगण्याची लक्षणे दूर करण्यास मदत करते. दररोज लवंग-लिंबू चहा प्यायल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि पोषक घटकांचे शोषण सुधारते. लिंबाच्या रसातील नैसर्गिक आंबटपणा पोटातील पीएच संतुलित करण्यासदेखील मदत करते आणि छातीत जळजळ व अॅसिड रिफ्लक्ससारख्या समस्या कमी करते.

वजन कमी होणे

लवंग आणि लिंबू या दोन्हीमध्ये असे गुण आहेत, जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात मदत करू शकतात. लवंगात संयुगे असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि लालसा कमी करण्यास मदत करतात. तसेच, लिंबू पचनास मदत करून परिपूर्णतेची भावना वाढवतो. लवंग-लिंबू चहा प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया वाढू शकते, भूक कमी होते आणि चरबी जाळण्यास प्रोत्साहन मिळते. याव्यतिरिक्त लिंबूमधील उच्च व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे चरबी कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी तुम्ही या चहामध्ये आणखी काही औषधी वनस्पती घालू शकता.

दातांचे आरोग्य

लवंग-लिंबू चहा दातांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे हिरड्यांची जळजळ कमी करणे, दातदुखीच्या वेदना कमी करणे यांसह तोंडाच्या जीवाणूंशी लढण्यास मदत होते. श्वासाची गुणवत्ता वाढते. लवंग चहाचे नियमित सेवन केल्याने दातांच्या समस्या कमी होतात.

कोणी सेवन टाळावे

लवंग चहा अल्सरसारख्या स्थिती असलेल्या व्यक्तींनी टाळावा. कारण- त्यातील मजबूत संयुगे पोटाच्या अस्तराला त्रास देऊ शकतात. गर्भवती किंवा स्तनपान देणाऱ्या हा चहा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्या लोकांनीही लवंग चहा टाळावा. ज्यामुळे अनेक आरोग्य स्थितींसाठी गंभीर धोका असू शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happens when you drink clove lemon tea every day health news srk