अनेकांच्या घरांत कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. त्यामुळे वॉशिंग मशीन वापरण्याची बेसिक माहिती सर्वांनाच असते; पण हे पुरेसे नाही. कारण- अशाही इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत की, ज्या तुम्ही फॉलो केल्यास वॉशिंग मशीन खूप दिवस चांगली चालते आणि कपडेही व्यवस्थित धुऊन निघतात. त्यात अनेकदा मशीनमध्ये किती प्रमाणात डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड डिटर्जंट टाकावे? हे अनेकांना समजत नाही. अशाने कपडे नीट स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये किती प्रमाणात डिटर्जंट पावडर, लिक्विड डिटर्जंट टाकावे ते आपण जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वॉशिंग मशीनमध्ये नेहमी फक्त लिक्विड डिटर्जंट वापरावे. कारण- हे खास मशीन वॉशसाठी तयार करण्यात आले आहे. तसेच पाण्यात ते लवकर विरघळते. त्यामुळे कपडे नीट स्वच्छ होण्यासाठी डिटर्जंट पावडरपेक्षा लिक्विड डिटर्जंट चांगले असते.

इतकेच डिटर्जंट कपड्यांसाठी पुरेसे

खूप अस्वच्छ कपडे स्वच्छ करण्यासाठी जास्त डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड डिटर्जंट वापरणे आवश्यक नसते. जर तुम्हीदेखील असे करीत असाल, तर वेळीच सावध व्हा. कपडे स्वच्छ करण्यासाठी लागणारे डिटर्जंटचे प्रमाण मशीनच्या लोड आकारावर अवलंबून असते. उदाहरणार्थ- दोन ते चार किलोच्या मशीनमध्ये फक्त एक चमचा डिटर्जंटची आवश्यकता असते. चार ते सहा किलो लोडच्या मशीनमध्ये दीड ते दोन चमचे आणि सात ते आठ किलोच्या मशीनमध्ये फक्त दोन ते तीन चमचे डिटर्जंट आवश्यक असते.

डिटर्जंट वापरताना घ्या ही काळजी

जर तुमच्याकडे डिटर्जंट पावडर वापरण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल, तर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ते मशीनमध्ये टाकताना काही गोष्टी लक्षात ठेवा. डिटर्जंट पावडरच्या पॅकेजिंगवर ती किती प्रमाणात वापरायची याबाबत माहिती दिलेली असते. अशा वेळी चमच्याने मोजून पावडर टाका. जर तुम्ही टॉप लोडर मशीन वापरत असाल, तर कपडे धुण्यापूर्वी ते टबमध्ये भिजत घाला. फ्रंट लोड मशीनमध्ये डिटर्जंट पावडर ड्रॉवरमध्ये ठेवा.

जास्त डिटर्जंट पावडर टाकल्यास काय होईल?

कपडे धुण्यासाठी तुम्ही मशीनमध्ये टाकत असलात तरी मशीनद्वारे कपडे धुताना, त्यातून डिटर्जंट पावडर पूर्णपणे निघत नाही. त्यामुळे जास्त प्रमाणात टाकलेल्या डिटर्जंट पावडरमुळेही कपड्यांचे नुकसान होऊ शकते. तसेच डिटर्जंट पावडर जास्त प्रमाणात टाकल्यास ती मशीनमध्ये जमा होऊन राहू असते; ज्यामुळे कधी कधी मशीन खराब होण्याची शक्यता असते. तेव्हा मशीनद्वारे कपडे धुताना जास्त डिटर्जंट पावडर वापरू नये.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the recommended amount of detergent to use in washing machine know the details sjr