रिक अ‍ॅसिड हा एक प्रकारचा कचरा आहे, जो प्युरीनयुक्त पदार्थांमुळे शरीरात वाढतो. मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांना युरिक अ‍ॅसिडची समस्या भेडसावत आहे. युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे किडनी, शरीरातील सांधेदुखी, संधिवात अशा अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेकदा औषधे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. आयुर्वेदानुसार हे एक पान खाल्याने तुम्ही शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करू शकता.

यूरिक अ‍ॅसिड म्हणजे काय?

तज्ज्ञांच्या मते, आपण दिवसभर जे काही अन्न खातो त्यामध्ये प्युरिन नावाचे रसायन असते जे युरिक अॅसिड तयार करते आणि हे युरिक अॅसिड लघवीद्वारे बाहेर पडते, परंतु जेव्हा आपल्या शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त होते तेव्हा ते लघवीद्वारेही बाहेर पडू शकत नाही.जेव्हा युरिक अॅसिड शरीरातून बाहेर पडत नाही, ते रक्तातच राहते. अशाप्रकारे, रक्तातील युरिक अॅसिड खडयांमध्ये रुपांतरीत होते आणि आपल्या सांधे आणि आजूबाजूच्या ऊतींमध्ये जमा होते. ज्यामुळे हायपरयुरिसेमिया होऊ शकतो. जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये युरिक अॅसिडची समस्या अधिक सामान्य असू शकते.

यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने काय होते?

यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ साठतात. त्यामुळे सांधेदुखी, सूज, किडनी स्टोन, गाऊट आणि यूरिन इन्फेक्शनसारख्या त्रासांचा धोका वाढतो. याशिवाय, जास्त यूरिक अ‍ॅसिडमुळे मधुमेहाचा (डायबिटीज) धोका देखील वाढतो. जाड व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते.

यूरिक अ‍ॅसिड कसे कमी करावे?

यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात आधी आपला आहार सुधारावा लागतो. प्युरिनयुक्त अन्नपदार्थ जसे की लाल मांस, जास्त प्रोटीनयुक्त फूड्स, डाळी, सॉस, मद्यपान इ. टाळणे गरजेचे आहे.

भरपूर पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा.

विड्याचे पान देईल आराम!

आयुर्वेदानुसार, विड्याचे पान (Betel leaf) यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी एक पान चघळल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. हे पान डिटॉक्सचे काम करते आणि प्युरिन तयार होण्याची प्रक्रिया रोखते. त्यामुळे यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी होण्यास मदत होते.

सूचना: हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.