Friendship Day 2023 : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मैत्री हे एक सुंदर नातं असतं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एक तरी जिवलग मित्र हा असतो. मैत्री हे असं नातं आहे, जे माणसाच्या सुख-दु:खांच्या काळात नेहमी बरोबर असतं. अशाच मैत्रीला सलाम करणारा दिवस म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’. या दिवशी मित्र-मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा दिल्या जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वर्षी ‘फ्रेंडशिप डे’ केव्हा?

दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे भारतात साजरा केला जातो. या वर्षी फ्रेंडशिप डे हा ६ ऑगस्टला रविवारी आहे. त्याशिवाय भारताबरोबर मलेशिया देशातही याच दिवशी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

हेही वाचा : Monsoon Skincare Routine : पावसाळ्यात ग्लोइंग आणि फ्रेश त्वचेसाठी ‘या’ ट्रिक्स फॉलो करायलाच हव्यात!

‘फ्रेंडशिप डे’चा इतिहास

असं म्हणतात की, १९३५ मध्ये अमेरिकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचा ठपका सरकारवर ठेवण्यात आला होता. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्र असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केली होती. तेव्हापासून अमेरिकेत तो दिवस
फ्रेंडशिप डे म्हणून पाळला जातो.
असेही म्हटले जाते की, १९३० या वर्षी हॉलमार्क ग्रीटिंगचे फाउंडर जोएस हॉलने फ्रेंडशिप डे साजरा करण्याची कल्पना सादर करीत या दिवशी आपल्या मित्रांना गिफ्ट्स, तसेच ग्रीटिंग कार्ड्स पाठवली होती.

हेही वाचा : Cyber Crime : रॅनसमवेअर ‘अकीरा’ व्हायरसची सगळीकडे दहशत; CERT-In ने दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना; वाचा काय आहे प्रकरण ….

का साजरा केला जातो ‘फ्रेंडशिप डे’?

फ्रेंडशिप डे हा मित्र-मैत्रिणींना समर्पित करणारा दिवस असतो. मैत्रीविषयी प्रेम अन् जिव्हाळा व्यक्त करणारा हा दिवस असतो. आपल्या आयुष्यातील मैत्रीचे महत्त्व पटवून देणारा हा दिवस असतो. एकमेकांप्रति प्रेम, आपुलकी, बंधुता वाढावी, यासाठी जगभरात ‘फ्रेंडशिप डे’ दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When is friendship day this year read history and why it is celebrated ndj