White Hair Remedy: आजच्या काळात, लहान वयात केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. मुलं असोत किंवा तरुण, महिला असोत किंवा पुरुष, सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागत आहे. पांढऱ्या केसांमुळे वयाच्या आधीच वयोवृद्ध झाल्यासारखं वाटतं. तर चेहऱ्याचं सौंदर्य देखील कमी होतं. अशा परिस्थितीत लोक केसांच्या रंगाचा (हेअर कलर्सचा) वापर करतात. कलर मेंदी वापरतात आणि नको नको ते उपाय करून पाहतात. पण या हेअर कलर्समध्ये असलेल्या रसायनांमुळे कधीकधी केस गळणे, त्वचेची ऍलर्जी आणि इतर समस्या उद्भवतात. तर अनेक प्रोडक्ट्सवर फुकटचे पैसेही खर्च होतात.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

तथापि, आता काळजी करण्याची गरज नाही. आयुर्वेदात एक घरगुती उपाय आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे पांढरे केस कोणत्याही हानीशिवाय काळे करू शकता. घरच्या घरी अगदी स्वस्तात मस्त तुम्ही तुमचे केस मुळापासून काळे करू शकता.

पूर्णिया जिल्हा फार्मसी सेंटरचे आयुर्वेदाचार्य डॉ. नंदकुमार मंडल म्हणतात की मोहरीच्या तेलात असलेले व्हिटॅमिन ए, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना खोलवर पोषण देतात.

नैसर्गिक केसांचे तेल कसे बनवायचे? (White hair solution at home)

ही रेसिपी तयार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे…

  • मोहरीचे तेल
  • कढीपत्ता
  • मेथीचे दाणे

एका पॅनमध्ये मोहरीचे तेल हलके गरम करा. नंतर त्यात मूठभर कढीपत्ता आणि एक चमचा मेथीचे दाणे घाला. कढीपत्ता काळा होईपर्यंत तेल शिजवा. नंतर तेल गाळून घ्या, थंड करा आणि बाटलीत भरा.

कसा कराल वापर?

रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना हे तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. हे तेल रात्रभर केसांमध्ये राहू द्या आणि सकाळी चांगल्या सौम्य शाम्पूने धुवा. नियमित वापराने काही दिवसांत केस काळे दिसू लागतील आणि तुम्ही कोणत्याही रसायनांशिवाय स्मार्ट दिसाल. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि सर्व वयोगटातील लोक ते वापरून पाहू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: White hair solution remedy to turn white hair black mustard oil ayurveda dvr