सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत,अनेक लोकांना हवामानात बदल होताच लगेच त्रास लगेच जाणवतो. शिवाय हिवाळ्यात थंडी मोठ्या प्रमाणात पडत असते त्या थंडीचा अनेकांच्या त्वचेवर लगेच परिणाम होत असतो. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. या दिवसांमध्ये थंड वारे, घसरलेले तापमान आणि थंड आणि गरम पाण्याच्या अतिवापरामुळे आपली त्वचा कोरडी पडते. तर थंड वातावरणामुळे आपणाला जास्त तहाण लागत नाही ज्यामुळे शरीरात पाणी जास्त जात नाही, त्यामुळेही शरीरात कोरडेपणा येतो.
कधीकधी कोरडेपणा इतका वाढतो की ऑयली क्रीम देखील काही कामाला येत नाहीत. शिवाय त्वचेचा कोरडेपणा वाढल्याने त्वचेची खाजही सुरु होते. हा कोरडेपणा ओठ, गाल आणि कपाळावर सर्वाधिक दिसून येतो. हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी दुधाची साय खूप प्रभावी ठरते. दुधाची साय नैसर्गिकरित्या त्वचेला हायड्रेट करते आणि त्वचा मॉइश्चरायझेशन ठेवते. त्वचेला साय लावल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचा निरोगी व गुळगुळीत दिसते. कोरफड जेल आणि दुधाची साय एकत्र वापरल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेची सूज दूर होते. त्वचेवर साय आणि एलोवेरा जेल एकत्र वापरण्याचे काय काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
हेही वाचा- हिवाळ्यात नेहमी थकल्यासारखं वाटतं का? तर आजपासून ‘हे’ पदार्थां खा आणि फ्रेश राहा
दुधाच्या सायचे त्वचेला होणारे फायदे –
हेल्थलाइनच्या बातमीनुसार, दुधाची साय लावल्याने त्वचेवर मोठा परीणाम दिसून येतो. त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते. साय त्वचेला हायड्रेट ठेवतेच शिवाय त्वचेवरील डाग दूर करते. चेहऱ्यावर साय लावल्याने त्वचेच्या स्किन पिग्मेंटेशनपासूनही सूटका होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी सायचा वापर करु शकता.
कोरफड –
हेही वाचा- तोंड सुकतं आणि अचानक तहान लागते? असू शकते ‘या’ गंभीर आजाराचे लक्षण, वेळीच अलर्ट व्हा!
वेबएमडीनुसार, कोरफड ही अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेली वनस्पती आहे जिचे त्वचेसाठी खूप फायदे आहेत. कोरफड त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि त्वचेचा कोरडेपणा दूर करते. हिवाळ्यात त्वचेवर कोरफड लावल्याने त्वचा स्वच्छ दिसते. हिवाळ्यात त्वचेवर कोरडेपणाचा थर तयार होतो, यावेळी कोरफडीचा वापर केल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.
दुधाची साय आणि कोरफड त्वचेला कशी लावायची –
हेही वाचा- दही आणि योगर्ट यात नेमका फरक काय? आरोग्यासाठी काय चांगले? जाणून घ्या..
चेहऱ्यावर दुधाची साय आणि एलोवेरा जेल लावताना, एका भांड्यात दोन चमचे दुधाची साय घ्या आणि त्यात एक चमचा एलोवेरा जेल टाका आणि दोन्हींचे चांगलं मिश्रण करा. आता चेहरा धुवून टिश्यू पेपरने स्वच्छ करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावून काही वेळ मसाज करा. या मिश्रणाने मसाज केल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. हे मिश्रण तुम्ही दिवसातून दोनदा त्वचेवर लावू शकता