scorecardresearch

दही आणि योगर्ट यात नेमका फरक काय? आरोग्यासाठी काय चांगले? जाणून घ्या..

दही आणि योगर्ट यातील फरक अनेकांना माहीत नसतो. तर आज आम्ही तुम्हाला दही आणि योगर्ट यामधला फरक नेमका कसा ओळखायचा याबद्दल सांगणार आहोत..

दही आणि योगर्ट यात नेमका फरक काय? आरोग्यासाठी काय चांगले? जाणून घ्या..
photo/; freepik

दही आणि योगर्ट हे सारखे आहेत असं अनेकांना वाटतं. पण असं नाहीये. होय, दही आणि योगर्ट हे थोडेफार सारखे दिसत असले तसंच हे दोन्ही डेअरी प्रॉडक्ट्स असले तरीही ते वेगवेगळे आहेत. दही समजून योगर्ट खाणारी अनेक लोकं आहेत. त्यांना दही आणि योगर्ट यामधला फरकच समजत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला दही आणि योगर्ट यामधला नेमका फरक सांगणार आहोत. तसंच या दोघांपैकी आरोग्यासाठी नेमकं कोणतं चांगलं याबद्दल देखील जाणून घेणार आहोत.

दही आणि योगर्ट सारखे आहेत का?

दही आणि योगर्ट एकसारखे मुळीच नाही आहेत. दही आणि योगर्ट हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आहेत. पण या दोघांची बनविण्याची पद्धतही पुर्णपणे वेगळी आहे. दही आपण विरझण टाकून घरच्याघरी बनवू शकतो. जे नैसर्गिक ॲसिडीक घटक टाकून बनवण्यात येतं. पण योगर्ट मात्र अशाप्रकारे बनवता येत नाही. योगर्ट हे कृत्रिम ॲसिड टाकून बनवण्यात येतं आणि ते बनवण्यासाठी बरीच प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे योगर्ट घरच्याघरी बनविणे शक्य नाही आहे.

दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया असतात. या बॅक्टेरिया मुळेच दही तयार होतं. दह्यात असलेलं बॅक्टेरियाच प्रमाण आपण दह्यामध्ये किती विरझण टाकतो यांवर अवलंबून असतं. तर योगर्टमध्ये Lactobacillus Bulgarisand Streptococcus thermophilus या बॅक्टेरियाचा वापर होतो. यामुळेच दही आणि योगर्ट हे दोन्ही वेगवेगळे दिसतात.

दह्यामध्ये नाही तर योगर्टमध्ये असतात वेगवेगळे फ्लेवर्स

योगर्ट ज्या पद्धतीने बनवतात त्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचा वापर करता येतो. जसे आंबा, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, पीच, किवी, रास्पबेरी, व्हॅनिला, पेपरमिंट इ. पण दहीमध्ये असे फ्लेवर्स बनवता येत नाही. दही सामान्यतः नॉर्मल चवीचेच असते. म्हणूनच त्यांची खाण्याची पद्धतही वेगळी आहे.

(हे ही वाचा: ‘हे’ आहे देशातील सर्वात शेवटचे रेल्वे स्टेशन; नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल..)

दही की योगर्ट आरोग्यासाठी नेमकं काय चांगलं?

दही आणि योगर्ट या दोघांमध्येही भरपूर पौष्टिक घटक असतात. उन्हाळ्यात किंवा मसालेदार जेवण जेवल्यानंतर डॉक्टर नेहमी दही खाण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसंच योगर्टमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स असतात. योगर्टचे असे काही प्रकार आहेत ज्यामध्ये दह्यापेक्षा भरपूर जास्त प्रमाणात प्रोटीन्स आहेत.

दही आणि योगर्ट या दोघांमध्येही व्हिटॅमिन्स आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. तसंच दह्यामध्ये दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. त्यामुळे दही खाणे हाडांसाठी चांगले मानले जाते. योगर्टच्या बाबतीत बोलायला गेलं तर बाजारात अनेक प्रकारचे फ्लेवर्ड योगर्ट मिळतात. पण त्यामध्ये प्रिझर्वेटीव्ह आणि साखर यांचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे फ्लेवर्ड योगर्ट खाणे शरीराला चांगले नाही असं सांगितलं जातं. तसंच योगर्ट खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर या समस्येपासून सुटका मिळते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 19:52 IST

संबंधित बातम्या