What Is The Reason Behind Yawn After You See Someone Else Yawn : जेव्हा तुम्ही दिवसभर काम करून थकता, कंटाळता किंवा जास्त वेळ जागे असता तेव्हा तुम्ही खूप जांभई देता. जांभई जेव्हा येते तेव्हा तुम्ही तुमचे तोंड उघडता, दीर्घ श्वास हवेत घेता. बहुतेक लोक दिवसातून ६ ते २३ वेळा जांभई देतात. अगदी प्राणीही…! पण, यादरम्यान तुमच्याही लक्षात एक गोष्ट नक्कीच आली असेल की, जेव्हा तुम्ही समोरच्याला जांभई देताना बघता तेव्हा तुम्हालाही जांभई येते; तर यालाच “संसर्गजन्य जांभई” (contagious yawning) असे म्हणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर ही संसर्गजन्य जांभई ऑटोमॅटिक (स्वयंचलितपणे) जाणवते, ज्याचा तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. पण, शास्त्रज्ञ म्हणतात की, ही पूर्णपणे स्वयंचलित प्रक्रिया नाही, कारण संसर्गजन्य जांभई (Yawn)फक्त चार किंवा पाच वयाच्या आसपास सुरू होते, जेव्हा मुलांमध्ये चांगली सहानुभूती विकसित होऊ लागते. सहानुभूती म्हणजे इतरांच्या भावना समजून घेणे होय. त्यामुळे एखाद्याला जांभई देताना पाहून तुम्हालाही जांभई देण्याची इच्छा होऊ शकते.

शास्त्रज्ञांना हे कसे कळते?

शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे की, जेव्हा लोक जांभई देताना त्यांच्या पालकांना किंवा मित्र-मैत्रिणींना पाहतात, तेव्हा त्यांना जास्त जांभई (Yawn) येते. संसर्गजन्य जांभईमध्ये सहानुभूती मोठी भूमिका बजावते. जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला जांभई देताना पाहता तेव्हा तुमच्या मेंदूला त्यांच्या भावना समजतात आणि तुम्हालाही जांभई येते. संसर्गजन्य जांभईमुळे सामाजिक संबंध आणि समूहातील समन्वय मजबूत होण्यास मदत होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, आपला मेंदू आपल्याला इतरांशी कनेक्ट होण्यात मदत करतो.

हेही वाचा…Vinesh Phogat : विनेश फोगटनं स्टीम बाथच्या मदतीनं वजन केलं कमी; एक तासात किती किलो वजन होईल कमी; डॉक्टरांकडून जाणून घ्या

जांभई देणारे प्राणी :

शास्त्रज्ञांना असेही आढळले की, माणसांसारखे पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे यांसारखे प्राणीसुद्धा जांभई देतात. खरं तर श्वान, चिंपांझी यांसारख्या काही प्राण्यांनाही संसर्गजन्य जांभई येते. जेव्हा एखादा चिंपांझी दुसऱ्या चिंपांझीला जांभई देताना पाहतो, तेव्हा तोही अनेकदा जांभई देतो, अगदी आपल्या माणसांप्रमाणेच… हे त्यांना एकमेकांशी सामाजिक संबंध निर्माण किंवा कनेक्ट होण्यास मदत करतात. याचा अर्थ अनोळखी व्यक्तीपेक्षा तुम्हाला तुमच्या जिवलग मित्राकडून किंवा कुटुंबातील सदस्याकडून जांभई येण्याची शक्यता जास्त आहे.

लोक जसजसे मोठे होतात तसतसे ते इतरांच्या भावना समजून घेण्यास अधिक चांगले होतात आणि जेव्हा ते इतरांना जांभई देताना पाहतात तेव्हा त्यांना अधिक जांभई येते. पण, जांभई पकडण्याची ही क्षमता वृद्ध झाल्यावर कमी होऊ शकते आणि हे मानव आणि चिंपांझी दोघांमध्ये दिसून येते. मानवांना विविध प्रकारच्या प्राण्यांकडून संसर्गजन्य जांभई येऊ शकते. केवळ त्यांचे पाळीव प्राणीच नव्हे, जे त्यांना आवडतात आणि त्यांना चांगले ओळखतात. हे दर्शवते की जांभई आपल्याला एकमेकांशी कनेक्ट होण्यास आणि समजून घेण्यास मदत करते, मग ती दुसऱ्या व्यक्तीशी असो किंवा प्राण्याशी.

जेव्हा आपण जांभई घेतो तेव्हा मेंदूमध्ये काय होते?

तुमच्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला काहीतरी करताना पाहता, तेव्हा हे न्यूरॉन्स सक्रिय होतात आणि ते तुम्हाला तेच करत असल्याचे जाणवतात. उदाहरणार्थ, जांभई. तुमचा मेंदू समोरची व्यक्ती काय करत आहे हे प्रतिबिंबित करत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्याला जांभई देताना पाहाल आणि जांभई देण्याची तीव्र इच्छा अनुभवाल, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या मेंदूचा तुमच्या मित्रांशी, कुटुंबाशी आणि अगदी पाळीव प्राण्यांशी कनेक्शन निर्माण करण्याचा हा मार्ग आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yawn why do or what is the reason behind people yawn while seeing other people who yawn its one way our brains help us connect with others asp