Benefits of eating Walnut: वर्षातील तिन्ही ऋतूंमध्ये हिवाळा हा आरोग्यासाठी लाभदायक समजला जातो, परंतु याच दिवसांत आरोग्याच्या अनेक समस्यादेखील उद्भवतात. या थंडीच्या दिवसांत नागरिकांनी आरोग्याबाबत सजग राहणे, गरजेचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. त्यामुळे आरोग्यदायी आहार, फळांवर भर द्यावा, असे आवाहन करण्यात येते.हिवाळ्यात ड्रायफ्रुट्स खाणे खूप फायदेशीर आहे.

यातील अक्रोडही आरोग्यासाठी खूप उपयोगी असून यामध्ये जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अक्रोड हे पोषक तत्वांनी युक्त एक अतिशय पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि इतर अनेक आवश्यक गोष्टी आढळतात ज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आरोग्य तज्ञ देखील दररोज अक्रोड खाण्याचा सल्ला देतात. रोज अक्रोड खाणे खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोकांना अक्रोड भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणे आवडते. अक्रोड खाण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

सुक्या मेव्यामध्ये अक्रोड हे औषधी गुणधर्माने भरपूर असते. कोलेस्टेरॉल कमी करणे, मेंदूची शक्ती वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो. अक्रोड कोणत्या रोगांमध्ये फायदेशीर आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

मेंदूसाठी फायदेशीर –

अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा ३, फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात जे मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि न्यूरॉन्स टिकवून ठेवण्यास मदत करतात.अक्रोड खाल्ल्याने मेंदूतील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक घटक मेंदूपर्यंत सहज पोहोचतात. याशिवाय अक्रोडमध्ये असलेले एल-कार्निटाइन मेंदूचे कार्य सुधारते. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, लक्ष केंद्रित करण्यास मदत होते आणि तणाव आणि चिंतेपासून आराम मिळतो.

त्वचा राहते मऊ –

अक्रोड खाल्ल्याने त्वचा मऊ राहते. त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि कोमल ठेवायची असेल तर रोज अक्रोड खा. यामुळे तुम्हाला सुंदर आणि निरोगी त्वचा मिळेल. वाढत्या वयाबरोबर त्वचेवर सुरकुत्या पडणे सामान्य गोष्ट आहे. पण अक्रोड खाल्ल्याने या सुरकुत्या कमी होऊ शकतात.

वजन कमी करण्यास मदत –

हल्ली लठ्ठपणाच्या समस्येने सगळेच हैराण झाले आहेत. वजन कमी करण्‍यासाठी आहार आणि व्‍यायाम यात समतोल राखणे आवश्‍यक आहे. अक्रोड हे एक ड्राय फ्रूट आहे जे तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकते. अक्रोडमध्ये प्रथिने, निरोगी चरबी, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. ज्यामुळे भूक कमी लागते आणि शरीराला ऊर्जा मिळते. रोज अक्रोड खाल्ल्याने चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

हृदयविकाराचा धोका कमी असतो –

अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की अक्रोड खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. यामुळे हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो.

हेही वाचा >> Kitchen Jugaad: १० किलो गाजर फक्त १० मिनिटांत सोलून होतील; कसं ते पाहा VIDEO

सूज कमी होणे –

शरीराच्या कोणत्याही भागात सूज कमी करण्याचे काम करते. संशोधकांच्या मते, अक्रोडमध्ये असलेले पॉलीफेनॉल ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल गुणधर्म असल्याने संसर्गाचा धोका देखील कमी करते.