विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष ग्रहमान तुमच्या चळवळ्या स्वभावाला पूरक आहे. वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही एकाच वेळी हातात घ्याल. व्यापारउद्योगात मनाप्रमाणे कमाई होईल. नोकरीच्या ठिकाणी एखादे काम तुम्ही उगीचच आळसाने लांबवाल. त्यापेक्षा ते वेळेत उरकलेले चांगले. घरामधला एखादा प्रश्न तुमच्या सल्ल्यामुळे सुटेल. पण त्याचे श्रेय द्यायला कोणीही तयार होणार नाही. तरुण मंडळींना एखादी नवीन व्यक्ती आकर्षति करेल.

वृषभ जे काम तुम्ही पूर्वी केलेले होते त्याचे श्रेय मिळेल. व्यापार-उद्योगात चांगल्या आणि वाईट या दोन्ही मार्गाने पसे कमविता येतात, पण तुम्ही मात्र फक्त चांगल्या मार्गाचाच अवलंब करा. नाहीतर भविष्यात त्याचा त्रास होईल. जोडधंदा करण्याची एखादी संधी साधून येईल. नोकरीच्या ठिकाणी जादा काम करून जादा पसे मिळविण्याची संधी उपलब्ध होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये चिडचिड होऊ देऊ नका.

मिथुन गेल्या काही महिन्यांत तुमची कामे ठप्प झाली असतील तर ती मार्गी लावण्याचा तुम्ही निश्चय कराल. व्यापारउद्योगात बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्हाला तुमची कार्यपद्धती बदलावी लागेल. त्यानिमित्ताने नवीन व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीच्या ठिकाणी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. तुमच्या दृष्टीने हा नवीन अनुभव असेल. घरामध्ये एखादा छोटासा मेळावा आयोजित केला जाईल.

कर्क मंगळाने गेल्या सात-आठ महिन्यांत तुम्हाला तुमचे अनेक निर्णय बदलायला भाग पाडले. त्याचा किती फायदा आणि किती तोटा झाला ते आता तुमच्या लक्षात येईल. व्यापारउद्योगात तुमची दूरदृष्टी आणि अचूक अंदाज यामुळे अचानक फायदा संभवतो. कारखानदार व्यक्ती देशात किंवा परदेशात भागीदारी किंवा मत्री कराराचे प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता आहे. घरामधल्या व्यक्तींना सल्ल्याचे महत्त्व पटल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल.

सिंह प्रचंड उत्साही अशी तुमची रास आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी उचलता. या आठवडय़ात असेच होणार आहे. व्यापारउद्योगात ठरविलेली कामे संपवल्याशिवाय नवीन काम हातात घेऊ नका. तुमचे बेत गुप्त ठेवा. नोकरीमध्ये जादा कामाच्या बदल्यात तुम्हाला जास्त मोबदला मिळणार नाही. नवीन नोकरी स्वीकारताना दृष्टिकोन सरळ ठेवा. घरामध्ये एखादा महत्त्वाचा सोहळा पार पडेल.

कन्या आठवडय़ाच्या सुरुवातीपासून तुमच्या पायाला िभगरी लागेल. जी कामे पूर्वी अर्धवट राहिलेली होती ती कामे तुम्ही हातात घ्याल.  व्यापार-उद्योगात अपेक्षेपेक्षा जास्त पसे हातात पडल्यामुळे एखादी नवीन गुंतवणूक करावीशी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा एखादा अंदाज बरोबर ठरल्यामुळे वरिष्ठ आणि सहकारी तुमचे कौतुक करतील. स्वत: काम करण्यापेक्षा तुम्ही इतरांकडून जास्त काम करून घ्याल.

तूळ ग्रहमान तुमच्या कल्पकतेला आणि सौंदर्यदृष्टीला वाव देणारे आहे. जे काम तुम्ही कराल त्यातून तुमचे वेगळेपण सिद्ध होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरल्याने तुमचा खिसा गरम असेल. एखाद्या नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी पूर्वी पगारवाढीचे आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये एखादे मंगलकार्य पार पडेल.

वृश्चिक ग्रहमान संमिश्र आहे. सहसा तुम्ही फारसे बोलत नाही. पण ज्या वेळेला इतरांना मार्गदर्शन पाहिजे असते त्या वेळेला अचूक सल्ला देता. व्यापारउद्योगात एखादे काम नेहमीच्या पद्धतीने करायला जाल, त्यात यश न मिळाल्याने तुमची बरीच दगदग आणि धावपळ होईल. पशाची शक्यतो उधारउसनवार करू नका. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम पूर्ण करण्याकरीता वरिष्ठ आग्रह धरतील.

धनू एखादा प्रश्न जेव्हा आपल्या गळ्यापर्यंत येतो त्या वेळी त्यातून बाहेर पडायला एखादी युक्ती सुचते. त्या युक्तीचा अवलंब केल्यावर प्रश्नांची तीव्रता कमी होते. व्यापारउद्योगात जी कामे अगदीच ठप्प झालेली होती ती कामे गती घेतील.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमची अडचण समजून घेतील. अनावश्यक कामे कमी झाल्याने एक प्रकारचा दिलासा लाभेल. घरामध्ये एखादा प्रश्न हलका झाल्यामुळे मन:स्वास्थ्य लाभेल.

मकर तुमचे करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्ही सक्रिय असाल. ही कामे तुम्ही व्यवस्थितरीत्या पार पाडल्याने सभोवतालच्या व्यक्तींना तुमचे कौतुक वाटेल. व्यापारउद्योगात पूर्वी केलेली गुंतवणूक फायदा मिळवून देईल. त्यांचा वापर तुम्ही पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्टकरिता कराल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामाच्या निमित्ताने नवीन व्यक्तींशी ओळख होईल. घरामधला माहोल आनंदी व उत्साही असेल.

कुंभ तुमची कामाची पद्धत ठरलेली असते, त्या पद्धतीने तुम्ही काम केलेत तर एक वेगळाच आनंद मिळतो. तसा आनंद तुम्हाला या आठवडय़ात मिळेल. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात धनलाभाने झाल्यामुळे आपण केलेल्या कामाचे चीज झाले असे तुम्हाला वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे असे काम तुम्हाला सांगतील की ज्यामधून तुमचा आíथक आणि इतर फायदा होईल. एखादी जुनी प्रॉपर्टी विकली जाईल.

मीन ग्रहमान तुम्हाला चांगले आहे. ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही इतरांना दिसाल. व्यापार-उद्योगात कामाचा व्याप वाढविण्याची इच्छा तीव्र होईल. त्याकरिता जादा भांडवलाची गरज भासेल. बाजारपेठेतल्या एखाद्या कमिटीवर तुमची नियुक्ती होईल. सप्ताहाच्या मध्यात अपेक्षित पसे हातात पडतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याला वाव असेल.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology 14th to 20th december