
चंद्र-शुक्राचा लाभ योग आपल्या आवडीनिवडी जपणारा, आपले छंद जोपासणारा योग आहे. नातीगोती जपाल. नोकरी-व्यवसायात उच्च पद भूषवाल.
शुक्र हर्षलचा केंद्र योग हा स्वच्छंदपणे आणि मनमोकळेपणाने जगण्याचा उत्साह देणारा योग आहे; परंतु मर्यादा ओलांडू नका.
सहकारी वर्गाचा विश्वास संपादन कराल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण होतील. मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल.
चंद्र-मंगळाचा केंद्र योग हा धाडस आणि साहस दाखवणारा योग आहे. मोठी जोखीम घेणे इष्ट ठरणार नाही.
चंद्र-मंगळाचा लाभ योग हा कर्माला भाग्याची जोड देणारा योग आहे.
चंद्र-शुक्राचा समसप्तम योग हा आपल्यातील निर्मितीक्षमतेला उत्तेजन देणारा योग आहे.
कुटुंबातील सदस्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. जोडीदारासह आनंदात वेळ घालवाल. प्रेमाचे बंध दृढ होतील.
नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला योग्य ठरेल. सहकारी वर्गाकडून वेळेत काम पूर्ण करून घेणे जिकिरीचे असेल.
चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा नव्या गोष्टी, नव्या पद्धती शिकून घेण्यासाठी पूरक योग आहे.
शनी-चंद्राचा समसप्तम योग आपल्या जिद्दीला शिस्तीची जोड देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळाल्याने आपली मते स्पष्टपणे मांडू शकाल.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.