विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष सर्व ग्रहयोग उत्साह वाढविणारे आहेत. तुमच्या राशीमध्ये असलेल्या  जबरदस्त महत्त्वाकांक्षा आणि इच्छाशक्तीच्या जोरावर एखादे काम मार्गी लावाल. व्यापारउद्योगात काहीतरी भव्यदिव्य करावे असा विचार तुमच्या मनात येईल. त्या दृष्टीने आवश्यक त्या माणसांची आणि पशांची तुम्ही जुळवाजुळव कराल. सप्ताहाची सुरुवात जरी कंटाळवाणी झाली तरी नंतर तुम्ही भरपूर काम कराल. घरामध्ये सर्व जबाबदारी अंगावर घेऊ नका.

वृषभ एखादे काम केले की त्याचे फळ लगेच मिळाले पाहिजे असा तुमचा बाणा असतो. पण या आठवडय़ात तुम्हाला त्यासाठी थांबणे भाग पडेल. त्यातून तुमचाच फायदा होईल. व्यापार उद्योगात हातातोंडाशी आलेली कामे एखाद दुसरा आठवडा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी साध्या आणि सोप्या वाटलेल्या कामात गुंतागुंत निर्माण होईल. घरामध्ये सर्व जण आपापल्या कामामध्ये मग्न असतील.

मिथुन ग्रहमान परस्परविरोधी आहे. तुम्हाला आता खूप काम करावेसे वाटेल. पण ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून आहात त्या व्यक्तींचा काही कारणाने उपयोग होणार नाही. व्यापारउद्योगातील कामाला गती येईल.  नोकरीच्या ठिकाणी तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा तुमचे वरिष्ठ आणि संस्था यांना चांगला उपयोग होईल. पण त्याचे श्रेय मात्र लगेच मिळणार नाही. घरामध्ये महत्त्वाच्या निर्णयामध्ये तुमचा पुढाकार असेल.  संपूर्ण आठवडा धावपळीत जाईल.

कर्क तुमच्या कष्टाळू स्वभावाची या आठवडय़ात परीक्षा होणार आहे. ज्या कामात नशिबाची साथ मिळेल असे वाटले होते त्यात काहीतरी गडबड होईल. व्यापारउद्योगात महत्त्वाची कामे स्वत: हाताळा. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुमचे नाही ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यामध्ये बराच वेळ जाईल. तुमची नेहमीची कामे अर्धवट राहिल्याने जरा चिडचिड होईल. घरातील व्यक्ती तुमचा सल्ला ऐकून घेतील.

सिंह कोणतेही नाते चिरकाळ टिकणारे नसते. त्यामध्ये कधी ना कधी खंड पडतो. या आठवडय़ामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या किंवा कामाच्या बाबतीत असा अनुभव येईल. व्यापारउद्योगात  एखाद्या निष्णात व्यक्तीचा सल्ला घेतलात तर तुमच्या कामाचा दर्जा अधिक चांगला होईल. छोटय़ा व्यावसायिकांना एखादे चांगले काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमत नव्हते ते काम वरिष्ठ विश्वासाने तुमच्यावर सोपवतील.

कन्या काही कामे अशी असतात जी आपल्याला स्वत:लाच करावी लागतात. अशा वेळेला मनाचा हिय्या करावा लागतो. तसा जर तुम्ही केलात तर या आठवडय़ात बरीच कामे पार पडू शकतील. व्यापारउद्योगात नजीकच्या भविष्यात चांगले पसे मिळविण्याकरिता आता खेळते भांडवल उभे करावे लागेल. नोकरीमध्ये जे काम अवघड आहे ते काम तुमच्या वाटय़ाला येईल. घरामध्ये प्रत्येक कामामध्ये तुमचा पुढाकार असेल.

तूळ ग्रहमान तुमच्या दृष्टीने संमिश्र आहे. इतरांकडून साथ न मिळाल्याने काही तातडीची कामे तुम्हाला एकटय़ाने करावी लागतील. व्यापारउद्योगात हातात जोडलेले पसे नजीकच्या भविष्यातील कार्यक्रमांसाठी गुंतवावे लागतील. त्यामुळे खूप पसे येऊनही ते शिल्लक ठेवता येणार नाहीत. नोकरीच्या ठिकाणी एखादे अवघड काम तुमच्या वाटय़ाला येईल.  घरामध्ये एकत्र येऊन काम करायचे ठरेल, पण आयत्या वेळेला सर्व जण माघार घेतील.

वृश्चिक जशी गरज असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचे धोरण बदलत राहता. या आठवडय़ात ज्या कामातून आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा आहे त्याच कामांना प्राधान्य द्याल. व्यापारीवर्गाला ग्रहमान अनुकूल आहे. एखादे काम विनाकारण लांबले असेल तर त्या कामाला गती येईल.  नोकरीच्या ठिकाणी स्वत:च्या मतलबाकरिता काम कराल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींना तुमच्याबाबतीत खात्री वाटेल.

धनू प्रयत्नांती परमेश्वर अशी मानणारी तुमची रास आहे. आठवडय़ाची सुरुवात जरी थोडीशी निराशाजनक झाली तरी तुम्ही कोणत्याही समस्येवर मात करायचे ठरवाल. व्यापारउद्योगात ज्यांनी पूर्वी तुम्हाला नकारघंटा ऐकविली होती त्यांच्याकडून मदतीची भाषा ऐकू येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला चांगल्या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतील. जोडीदाराशी किरकोळ कारणावरून दुरावा होईल.

मकर ग्रहमान तुमची थोडीशी परीक्षा बघणारे आहे. एखादे काम सरळ मार्गाने होत नाही, असे पाहिल्यानंतर तुम्ही नाइलाजाने वाकडय़ा वाटेने जायचे ठरवाल. व्यापारउद्योगात नजीकच्या भविष्याकरिता जे बेत तुम्ही आखले आहेत त्याकरिता भांडवलाची सोय करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामातून आपला फायदा आहे अशा कामाला तुम्ही प्राधान्य द्या.  घरामध्ये काटकसरीवरून किरकोळ वादविवाद होतील.

कुंभ गेल्या एक-दीड महिन्यामध्ये जे काम तुम्ही केलेले होते, त्याला  आता प्रतिसाद मिळायला लागल्यामुळे तुम्हाला एक प्रकारची स्फूर्ती लाभेल. व्यापारउद्योगात तुमची कल्पनाशक्ती आणि तुम्ही केलेले प्रयत्न याचा योग्य समन्वय झाल्यामुळे केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी अवघड प्रश्नामध्ये तुम्हाला मर्म सापडेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल.

मीन ग्रहमान फारसे उत्तम नाही. त्यामुळे प्रत्येक काम नेटाने पुढे न्यावे लागेल. व्यापारउद्योगात सरकारी कामे आणि कोर्टव्यवहार याकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताहाच्या मध्यानंतर अपेक्षित पसे हाती पडतील. जोडधंदा असणाऱ्यांना एखादे नवीन काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मुद्दा वरिष्ठांना पटवून देण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल. घरामध्ये किरकोळ वादविवादावर मार्ग निघेल.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology from 17th to 23rd august