यंदाच्या उन्हाळी सुट्टय़ांचा आरंभच मुळी ‘भूतनाथ रिटर्न’ या चित्रपटाने झाला आहे. अर्थात, हाही ‘भूतनाथ’चा सिक्वल असला तरी मूळ चित्रपट न पाहताही दुसऱ्या चित्रपटांची मजा अनुभवता येऊ शके ल. पहिल्या चित्रपटात स्वर्गात पोहोचलेल्या ‘भूतनाथ’ला भूत असूनही कोणीच घाबरत नाही म्हणून पुन्हा मुलांना घाबरवण्याचे मिशन देऊन पृथ्वीवर पाठवले जाते. इथे भूतनाथची गाठ पडते ती अक्रोदशी. जो आजच्या मुलांचे प्रतिनिधित्व करत असल्याने भुताला अजिबात घाबरत नाही. भुताला मुलांनी न घाबरणं हे या चित्रपटाचं वैशिष्टय़ नाही तर याच भुताला हाताशी धरून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जो निवडणुकीचा घाट घातला जातो ते पाहणं रंजकच नाहीतर लहान मुलांनी मनावर घेतले तर मोठय़ांच्या प्रस्थापित विश्वालाही ते हादरा देऊ शकतात, हे दिग्दर्शक नितेश तिवारीने यात दाखवून दिले आहे. असाच संदेश नितेशने त्याच्या पहिल्या चित्रपटातही दिला होता. सलमान खानची निर्मिती असलेल्या या नितेशच्या ‘चिल्लर पार्टी’ने एका कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराशी क सा लढा दिला हे पाहिले तर मोठय़ांनाही आपल्या नाकर्तेपणाची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. ‘तारे जमीं पर’ हा खरंतर मुलांपेक्षा पालकांना त्यांच्या जबाबदारीचा फार बारकाईने विचार करायला लावला असला तरी निकुंभ सरांनी छोटय़ा ईशानच्या मनातला गोंधळ दूर करत त्याच्यापुढे उभे केलेले रंगीबेरंगी विश्व सगळ्याच मुलांसाठी प्रेरणादायी आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित ‘स्टॅनली का डब्बा’ हा तर मुलांचे नेहमीचे विश्व त्यांच्यासमोर उभे करत त्यांच्यातल्याच एका अनाथ स्टॅनलीच्या वेगळेपणाची कथा मांडतो. स्टॅनलीच्या अडचणी एकीकडे पण, आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं स्वप्न जेव्हा पाहिलं जातं तेव्हा लहान मुलं असो वा मोठे त्यांना प्रचंड कष्टाशिवाय यशाची भाकरी मिळत नाही, हे सांगत त्यांना लहान वयातच स्वप्न पाहा आणि ती झटून पूर्ण करा हे सांगण्याचा प्रयत्न अमोल गुप्ते यांनी त्यांच्या आगामी ‘हवा हवाई’ चित्रपटात केला आहे. पुन्हा एकदा पार्थोला स्केटिंग रेसरच्या भूमिकेत पाहण्याची संधी देणारा ‘हवा हवाई’ हा चित्रपट ९ मेला प्रदर्शित होणार आहे. रस्कीन बाँड यांच्या कादंबरीवर आधारित ‘द ब्ल्यू अम्ब्रेला’, ‘हॅलो’, ‘मकडी’ आणि मणीरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला मतिमंद मुलीच्या जगण्याची कथा सांगणारा ‘अंजली’ हे चित्रपटही मुलांनी खास सीडी घेऊन पाहावेत असे आहेत. भारतातील पहिला थ्रीडी चित्रपट म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो १९९८ सालचा ‘छोटा चेतन’ही एकदा तरी पाहावा असा आहे.
हॉलीवूडमध्ये लहान मुलांसाठीच्या चित्रपटांची यादी खूपच मोठी आहे आणि त्या चित्रपटांचे वैविध्यही तितकेच आहे. या वर्षांच्या सुरुवातीपासूनच हॉलीवूडच्या अॅनिमेशनपटांनी दरवर्षीप्रमाणे भारतात पाऊल ठेवले आहे. ऑस्कर विजेता ‘फ्रोझन’, ‘रिओ २’, ‘टारझन’ हे अॅनिमेशनपट आवर्जून पाहावेत असेच आहेत. पण, खास घेऊन पाहावेत अशा अॅनिमेशनपटांची नावेही तितकीच मोठी आहेत. स्वत:तले सामथ्र्य शोधून सुपरहीरोसारखा लौकिक मिळवणाऱ्या ‘द इन्क्रेडिबल्स’ची कथा असेल, आपल्याच खेळण्यांना वाचा फुटली तर त्यांच्या छोटय़ा मालकांविषयीचे त्यांचे विचार-अपेक्षा यांची गोष्ट सांगणारी ‘टॉय स्टोरी’, ‘मादागास्कर’ आणि ‘आइस एज’ चित्रपटांच्या मालिका, धावत्या गाडय़ांना अॅनिमेटेड रूपात बोलतं करणाऱ्या ‘कार्स’ची चित्रपट मालिका हे अॅनिमेशनपट मुलांना थक्क करून सोडतात पण, त्यांच्याच छोटय़ा छोटय़ा विश्वातल्या वस्तूंना बोलतं करत त्यांच्या जडणघडणीत वेगळ्या अर्थाने हातभार लावतात. याशिवाय, शार्कसारख्या माशाशी दोस्तीची कथा सांगणारा ‘फ्री विली,’ अक्रम नावाच्या सिंहाचे राज्य असणाऱ्या अद्भुत ‘नार्निया’त प्रवेश करणारे चौघे बहीण-भाऊ, अक्रमच्या सहवासाने त्यांचे बदलत गेलेले नाते, चांगल्या-वाईटाची समज देत लढायला शिकवणारे आणि अद्भुताच्या दुनियेतून पुन्हा वास्तवात जगायला शिकवणाऱ्या ‘नार्निया क्रॉनिकल्स’च्या गोष्टी, हॅरी पॉटरच्या ‘हॉग्वर्ड’च्या जादुई विश्वातील करामती तर प्रत्येक चित्रपटागणिक जगण्याची काही नवी तत्त्वं मुलांना शिकवून जातात. तीच गोष्ट जादुई अंगठीच्या मोहापासून स्वत:ला कसोशीने दूर ठेवण्याचा प्रयत्न करत मिशन यशस्वी करणारे छोटय़ा हॉबिट्सचा ‘लॉर्ड ऑफ द िरग्ज’ कितीही मोठा असला तरी तो बघताना मुलांनाच काय मोठय़ांनाही कंटाळा येत नाही.
‘माव्र्हल’ आणि ‘डीसी’च्या कॉमिक सुपरहीरोंचे युद्ध कॉमिकच्या पुस्तकातून मोठय़ा पडद्यावर उतरलेल्या या सुपरहीरोंनी सध्या आबालवृद्धांच्या विश्वात मोठा हंगामा केला आहे. ‘माव्र्हल’ आणि ‘डीसी’ कॉमिक बुकच्या दुनियेतले हे दोन दादा आणि त्यांच्या प्रकाशनातून उतरलेल्या सुपरहीरोंना हॉलीवूड दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या प्रीक्वल आणि सिक्वलच्या माध्यमातून असं काही प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग करून टाकलं आहे की.. नव्याने येणाऱ्या कॉमिक बुकइतकीच नव्याने येणाऱ्या चित्रपटाबद्दल उत्कंठा वाढत राहते. एकीकडे ‘डीसी’च्या सुपरमॅन, बॅटमॅनने आजवर लोकांच्या मनावर गारूड केलं आहे. तर पारंपरिक सुपरहीरो आणि अद्ययावत तंत्रज्ञान, विज्ञान यांचा चपखल वापर करत ‘माव्र्हल’ने मोठय़ा पडद्यावर आपल्या सुपरहीरोंच्या विश्वाचे छान जाळे विणले आहे. ‘कॅप्टन अमेरिका’, ‘एक्समेन’, ‘हल्क’, ‘स्पायडरमॅन’, ‘आयर्न मॅन’ आणि ‘थॉर’ हे माव्र्हलचे सगळे सुपरहीरो चित्रपटातून स्वतंत्रपणे येऊन गेले आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या सिक्वल आणि प्रीक्वलच्या माध्यमातून रंगवलेल्या कथा तर आपल्याला भुरळ घालतात. या प्रत्येक सुपरहीरोचे वैशिष्टय़ वेगळे आहे, जग वेगळे आहे पण, हेतू एकच आहे लोकांना दुष्ट शक्तींपासून दूर ठेवण्याचा. २००० साली आलेला ‘एक्समेन’ हा अद्भुत शक्ती प्राप्त झालेले मानवी अवतार म्युटंट्स आणि मानवजात यांच्यात उभं राहिलेलं युद्ध आपल्यासमोर ठेवतो. त्यानंतर लागोपाठ आलेल्या ‘एक्समेन द लास्ट स्टँड’, ‘एक्समेन ओरिजिन वुल्वरिन’, ‘एक्समेन फर्स्ट क्लास’मधून म्युटंट्स का झाले, त्यांना मानवजातीविरुद्ध ठाकण्यासाठी कारणीभूत ठरलेले घटक, माणसांबरोबर राहून विधायक काम करू पाहणारे म्युटंट्स आणि माणसाला मारून म्युटंट्सची सत्ता स्थापण्याचे ध्येय असणारे अशी झालेली सरळसोट विभागणी अशा वेगवेगळ्या दृष्टीने ‘एक्समेन’ची कथा पुढे सरकली आहे. या सीरिजचा आठवा भाग ‘एक्समेन डेज ऑफ फ्युचर पास्ट’ २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने ‘एक्समेन’चे हे काल्पनिक विश्व सीडी घेऊन पाहता येईल.
माव्र्हलच्याच ‘स्पायडरमॅन’च्या दोन भिन्न आवृत्त्या हॉलीवूड निर्मात्यांनी आणल्या आहेत. टोबी मॅग्वायरने रंगवलेल्या ‘स्पायडरमॅन’चे आत्तापर्यंत चार चित्रपट येऊन गेले आहेत. मात्र, ‘द अमेझिंग
सिक्वल आणि प्रीक्वल यांचा अफलातून धमाका असणारे काही चित्रपट पुढच्या दोन-तीन महिन्यांत छोटय़ा दोस्तांसाठी भेटीला येणार आहेत. यात ‘डॉन ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स,’ ‘गॉडझिला’ आणि ‘ट्रान्सफॉर्मर्स एज ऑफ एक्स्टिंशन’ यांचा उल्लेख करावा लागेल. त्यामुळे या चित्रपटांचे आधीचे भाग सुट्टय़ांमध्येच पाहून घेतले तर आगामी चित्रपटांची मजा काही वेगळीच ठरेल.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
‘चिल्लर पार्टी’चा चित्रपट खजिना
शाळेच्या दिवसांत ‘बाल’चित्रपट पाहणं म्हणजे पर्वणी असे. मुलांसाठी म्हणून हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच चित्रपट बनायचे आणि तेही शाळांच्या मदतीने मुलांना दाखवले जायचे.

First published on: 16-05-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids special