‘‘मोठय़ा आपत्ती किंवा घोडचुकांमुळे नव्हे तर लहानशा वाटणाऱ्या बाबींचा सातत्याने विनाश करण्यामुळेच माणसाच्या आनंदाला ग्रहण लागते.’’
अलीकडेच प्रकाशित झालेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्यांच्या अधिवासाचा, परिसंस्थेचा अहवाल वाचताना अर्नेस्ट डिम्नेट या फ्रेंच अभ्यासकाच्या या अवतरणाची आठवण झाली. माणसाने माणसासमोर काय वाढून ठेवले आहे याची कल्पना हा अहवाल वाचताना सहज येते. ग्रामीण भागातील वाचकांना कदाचित असे वाटेल की, हा अहवाल मुंबई परिसरातील बिबळ्यांचा आहे, त्याचा आपल्याशी काय संबंध? पण असे वाटून घेऊ नका. हा अहवाल ग्रामीण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर समस्त भारतदेशासाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे. बिबळ्याने माणसावर हल्ला करण्याच्या घटना या काही केवळ महाराष्ट्रातच घडत नाहीत तर देशभरात असे प्रकार घडत आहेत. हा अहवाल महत्त्वाचा आहे, कारण तो या सर्व घटना-घटितांमागची महत्त्वाची कारणमीमांसा करतो. संपूर्ण भारतासाठी लागू असलेल्या त्या कारणाचे मूळ हे वाढत्या शहरीकरणाशी आणि बिबळ्यांच्या अधिवासासंदर्भात आपल्या मनात असलेल्या गैरसमजाशी जोडलेले आहे. गैरसमजाचा हा भाग दूर करण्यात आपल्याला यश आले तर बिबळ्या आणि मनुष्यप्राणी दोघांसाठीही ते अधिक चांगले असणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हा शास्त्रीय अहवाल हे त्यासाठीचे योग्य निमित्त आहे.
खरे तर बिबळ्यांच्या हल्ल्यांमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न आजवर अनेकदा झाला आहे. त्यात हे लक्षात आले की, त्याने आजवर केलेले हल्ले हे केवळ बैठय़ा अवस्थेतील माणसावर (प्रामुख्याने प्रातर्विधीला बसलेल्या व्यक्ती) किंवा लहान मुलांवर झाले आहेत. मुळात हल्ले का होतात त्याची कारणमीमांसा स्पष्ट होत नव्हती. तो हिंस्र अर्थात रानटी प्राणी आहे, त्यामुळेच हल्ले होत असणार हे माणसाचे त्यामागचे गृहीतक होते.
त्याला सर्वप्रथम छेद देण्याचे काम यशस्वीरीत्या केले ते जीवशास्त्राच्या डॉ. विद्या अत्रेयीने. तिने जुन्नर परिसरात आणि त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केलेल्या बिबळ्यांच्या अभ्यासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघडकीस आल्या. सर्वात पहिली म्हणजे बिबळ्या हा माणसाला घाबरणारा तरीही त्याच्या सर्वाधिक जवळ राहणारा प्राणी आहे. आपल्याला वाटते की, तो जंगली प्राणी असल्याने तो जंगलात राहत
निकितच्या या शास्त्रीय अहवालावर बरीच टिप्पणी झाली पण एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे सर्वाचेच दुर्लक्ष झाले. कुत्रा हेच राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्याचे महत्त्वाचे खाद्य असल्याच्या मुद्दय़ावर सर्वानीच लक्ष केंद्रित केले. कारण त्यात बातमीमूल्य होते, पण हा अहवाल असे सांगतो की, कुत्रा हेच महत्त्वाचे खाद्य असण्यामध्ये २०१२ सालापासून आतापर्यंत घट झाली आहे. पूर्वी कुत्र्याचेच प्रमाण सर्वाधिक होते. आता मात्र राष्ट्रीय उद्यानातील सांबर, चितळ यांची संख्या वाढल्याने बिबळ्याच्या विष्ठेमध्ये त्यांचे सापडणारे प्रमाणही वाढले आहे. हा तोच कालखंड आहे की, ज्यामध्ये बिबळ्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये पूर्ण घट झालेली दिसते. म्हणजे गेल्या चार वर्षांत एकावरही बिबटय़ाच्या हल्ल्यात प्राण गमावण्याची वेळ आलेली नाही. जंगलामध्ये मुबलक खाद्य उपलब्ध असणे या मुद्दय़ाने यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसते. मनुष्य व प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी महत्त्वाचा असलेला हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षितच राहिला. बातमीमूल्याच्याच बाबतीत बोलायचे तर मनुष्यहानी टाळणाऱ्या किंवा कमी करण्याच्या मुद्दय़ाला बातमीमूल्यातही सर्वात वरचेच स्थान असायला हवे, पण त्याचे भान माध्यमांना आहे कुठे? माणसाला कुत्रा चावला तर त्याची बातमी होत नाही, मात्र माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी ठरते, असेच माध्यमशास्त्रांच्या वर्गात शिकवले जात असेल; तर मग बिबळ्याचे जंगलातील भक्ष्य वाढले आहे, यापेक्षाही अधिक लक्ष कुत्र्याकडे जाणे तेवढेच स्वाभाविक ठरते!
विनायक परब
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2015 रोजी प्रकाशित
बातमीमूल्याचा धडा!
‘‘मोठय़ा आपत्ती किंवा घोडचुकांमुळे नव्हे तर लहानशा वाटणाऱ्या बाबींचा सातत्याने विनाश करण्यामुळेच माणसाच्या आनंदाला ग्रहण लागते.’’

First published on: 10-07-2015 at 01:33 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard