तुम्हाला काय वाटलं हे चित्र पाहून?
गेल्या वर्षी याच पानावर आपण भारतीय चित्रेतिहासातील जुन्या पिढीतील कलावंतांची चित्रे पाहिली व त्यांची वैशिष्टय़ेही समजून घेतली. २०१५ या नव्या वर्षांत आता आपण तुलनेने तरुण असलेल्या, समकालीन कलावंतांकडे वळतो आहोत. त्यांची चित्रं-शिल्प, मांडणीशिल्प असे अनोखे प्रकार तुम्हाला इथे पाहता येतील. शिवाय त्याबाबत असलेलं तुमचं मतही व्यक्त करता येईल.
त्या कोशातून कीटक नेमका बाहेर पडत असतानाचा तो क्षण म्हणजे त्याचा जन्मक्षणच असतो. असा क्षण तुम्हाला नेमका टिपता येणं हे छायाचित्रकाराचं नेमकं कौशल्य असतं.. असाच एक नेमका क्षण टिपला आहे, वेदवती पडवळ हिने..