महात्माजींचे चरित्र मला नेहमीच भुरळ घालते. बापू म्हणून त्यांचा झालेला प्रवास आणि देशाची पारतंत्र्यातून त्यांनी केलेली सुटका हे सर्वाना ज्ञात आहे. आणि माझ्या मते, या सर्व प्रवासाचा प्रारंभ दक्षिण आफ्रिकेच्या रेल्वेतून महात्माजींच्या फेकलेल्या सामानात आहे. ती लागलेली ठेच महात्माजींच्या स्वत्वाला खऱ्या अर्थाने जागृत करणारी ठरली आणि त्यांच्या स्वाभिमानाला तिने ललकारले. पुढचा प्रवास त्या आव्हानातून सुरू झाला. स्वाभिमानाने स्वातंत्र्याची वाट दाखविली.
तुमच्या मनात तुमची स्वत:बद्दलची असलेली प्रतिमा म्हणजे स्वाभिमान. अरेरावी स्वभावाच्या ‘अरेला कारे’ ज
स्वाभिमान ही प्रदर्शनीय बाब नव्हे, तर ती संस्मरणीय ठेव असावी. तिची जागा हृदयस्थ सदान्कदा उफाळून येऊन त्याचा धगधगता अंगारही होऊ नये, पण त्याची ऊब मात्र कायम राहावी.
‘The greatest thing in the world is to know how to belong to oneself’ हे मायकेल डी मॉन्टेनचे उद्गार आपल्याला आधी स्वत:ची पूर्ण ओळख करून घेण्याची सूचना देतात. आपणच आपल्या प्रेमात असावे. त्यात काही गर नाही. ‘जब वी मेट’ या गाजलेल्या िहदी चित्रपटात करीना उद्गारते, ‘‘मं मेरी अपनी सबसे फेवरिट हूँ.’’ तिचे स्वत:शीच गुरफटलेले, खळाळणारे व्यक्तिमत्त्व आणि सिनेमाच्या दुसऱ्या भागात आत्मविश्वास आणि स्वाभिमान हरवलेली करीना या सिद्धान्ताची साक्ष देतात. कन्फुशियसचे उद्गार होते- “Respect yourself and the world will respect you.” स्वत:बद्दल आग्रही, आक्रमक, आसक्ती नाही, पण यथायोग्य सन्मान असणे योग्यच. तुमचा तुमच्या क्षमतेवर आणि आंतरिक क्रियाशीलतेवर विश्वास हवा. तुमचे सारे अस्तित्वच जणू एखाद्या इंद्रधनुष्यासारखे असावे आणि त्याची दोन्ही टोके तुमच्याच हातात असावी.
स्वाभिमानी असणे म्हणजे गर्वष्ठिपणा नाही. ताठ कणा आणि र्तुेबाज ताठरता यांत फरक हा आहेच. पण स्वाभिमानी ताठ कणा नसेल तर आपण झुकतो हे पाहिल्यावर झुकवू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढते, हेच खरे.
तेव्हा करायचे इतकेच, की स्वाभिमानाला प्रयत्नपूर्वक जपायचे, जोपासायचे. त्याचा मुकूट नाही मिरवला तरी चालेल, पण त्याचे पायदळी तुडविले जाणारे निर्माल्य होता कामा नये. त्याचे रूप सदासर्वदा धगधगत्या अंगाराचे नाही, तर देवघरात मंद तेवणाऱ्या समईचे हवे. ती तुमच्या अस्तित्वाची निशाणी व्हावी. तुम्हाला इतरांनी गृहीत धरू नये. कधी अंकगणितातला ‘हातचा’ म्हणून वापर होऊ नये. पत्त्यांच्या कॅटमधल्या ‘पपलू’सारखे तुम्हाला कुठेही लावले जाऊ नये. तुम्हाला तुमची मते असावीत, ती व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि सामथ्र्य असावे, यालाच स्वाभिमान म्हणतात.
.. अमिताभच्या गाजलेल्या ‘दीवार’ चित्रपटातील एक दृश्य मी कधी विसरू शकत नाही. नरिमन पॉइंटच्या गगनचुंबी हॉटेलाच्या काचेच्या खिडकीतून रस्त्यावर चालणाऱ्या आपल्या भूतकाळाकडे बघत.. दावरसेठने फेकलेल्या पशाला स्पर्श न करता आमचा विजय म्हणतो.. ‘‘दावर साब, मं आज भी फेंके हुए पसे नहीं उठाता!’’
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2014 रोजी प्रकाशित
स्वाभिमान
महात्माजींचे चरित्र मला नेहमीच भुरळ घालते. बापू म्हणून त्यांचा झालेला प्रवास आणि देशाची पारतंत्र्यातून त्यांनी केलेली सुटका हे सर्वाना ज्ञात आहे.
First published on: 16-11-2014 at 06:16 IST
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhi and swabhiman