आवडती पुस्तके
फार फार तर मी असे म्हणेन की जे आवडते त्यात अधिक आवडणारे- जे पुन: पुन्हा वाचावेसे वाटते ते..
१) श्यामची आई – साने गुरुजी
२) ययाती – वि. स. खांडेकर
३) कुणा एकाची भ्रमणगाथा – गो. नी. दांडेकर
४) कोसला – भालचंद्र नेमाडे
५) प्रतिस्पर्धी – किरण नगरकर
६) प्रारंभ – गंगाधर गाडगीळ
७) दिवे गेलेले दिवस – रंगनाथ पठारे
८) आंधळ्याच्या गायी – मेघना पेठे
९) उदकाचिया आर्ती – मिलिंद बोकील
१०) नक्षत्रांचे देणे – आरती प्रभू
११) पुष्कळा – पु. शि. रेगे
१२) जेजुरी – अरुण कोलटकर
१३) बटाटय़ाची चाळ – पु. ल. देशपांडे
१४) किमया – माधव आचवल
१५) काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई
– कमल देसाई
१६) विरुपिका – विंदा करंदीकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नावडती पुस्तके
मुळात साहित्य मला मनापासून आवडते आणि त्यात नावडते ठरवायचे झाले तर ते कठीण आहे. असे कसे साहित्याला बंदिस्त करावे? हे तर स्वत:लाच कोंडून ठेवण्यासारखे. इतर अनेक साहित्यिकांची क्षमा मागून.

मराठीतील सर्व आवडनिवड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhakar kolte books choices