पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात ते नेपाळसमवेत विविध करारांवर स्वाक्षऱ्या करतील अशी अपेक्षा आहे. परराष्ट्र धोरणात शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देणारे भाजप सरकारचे धोरण आहे.सतरा वर्षांमध्ये नेपाळला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. यापूर्वी जून १९९७ मध्ये आय.के. गुजराल यांनी भेट दिली होती. मोदींच्या नेपाळभेटीत द्विपक्षीय संबंध दृढ होतील अशी अपेक्षा आहे. नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांच्यासमवेत मोदी चर्चा करतील. तसेच नेपाळच्या संसदेत भाषण करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कौल यांच्यानंतर हा सन्मान मोदींना मिळाला आहे. नेपाळभेटीत मोदी पशुपतीनाथ मंदिरात विशेष पूजा करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2014 रोजी प्रकाशित
नरेंद्र मोदी रविवारी नेपाळच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात ते नेपाळसमवेत विविध करारांवर स्वाक्षऱ्या करतील अशी अपेक्षा आहे.

First published on: 02-08-2014 at 01:26 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi to visit nepal on sunday