News Flash

ठाकरे घराण्यात कुणी निवडणूक लढवली नाही

आगामी विधानसभा निवडणुकीत स्वत: उभे राहण्याची घोषणा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी आपल्या आधीच्या विधानाला विसंगत वक्तव्य केले.

काँग्रेसचे काम करण्यासाठी मुक्त

महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर असताना पक्षीय राजकारण न करता, मी या पदाचा सन्मान केला. आता या पदावरून पायउतार झाल्यामुळे उद्यापासून मी काँग्रेससाठी सक्रियपणे काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल

कथोरे यांचा राष्ट्रवादीला रामराम

पक्षांतर्गत विरोधकांच्या कारवायांना कंटाळून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीस सोडचिट्ठी दिली असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

थीम पार्कचा शिवसेनेला धसका!

स्वत:ला काही चांगले करता येत नाही आणि दुसऱ्याने केलेले पाहावत नाही, अशी शिवसेनेची स्थिती झाल्यानेच भांडुप येथील मनसेच्या थीम पार्कला विरोध सुरू केला आहे.

सूर्यकांता पाटील राष्ट्रवादीतून बाहेर

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते पक्षाचे नवे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंतच्या पक्षनेत्यांवर यथेच्छ टीका केल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपला १५ वर्षांचा प्रवास थांबविला.

घोटाळ्यातून नावे वगळण्यासाठी दबाव

कोळसा व राष्ट्रकुल घोटाळ्याच्या लेखा अहवालातून नाव वगळण्यासाठी संयुक्त पुरोगामी सरकारमधील काही राजकारण्यांनी दबाव आणला, असा आरोप माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) विनोद राय यांनी केला आहे.

बहिष्कार हा सरकारचा पळपुटेपणा

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याच्या विकासाच्या विविध योजना राबविल्या जात असताना अशा कार्यक्रमावर काँग्रेस आघाडी सरकार बहिष्कार टाकून निषेध करीत असेल तर तो जनतेपासून पळवाट काढण्याचा प्रकार असल्याचे

निवडणुकीची घोषणा या आठवडय़ात?

हरयाणा, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर व झारखंड या चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.

अखिलेश यांचा भाजपला टोला

‘लव्ह जिहाद’चा मुद्दा भाजप उपस्थित करत आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांची अशा स्वरूपाच्या चित्रपटांमध्ये भूमिका करताना कोणतीही हरकत नव्हती असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी

जास्त जागा द्या, अन्यथा वेगळे लढू- राष्ट्रवादी

लोकसभेच्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून घोळ सुरू असतानाच जास्त जागा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने दबावाचे राजकारण सुरू केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही नोकरीत ५ टक्के आरक्षण?

पोलिसांच्या पाल्यांना पोलीस भरतीत आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) चालक, वाहक, मेकॅनिक व इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या वारसांना एसटीच्या नोकरभरतीत ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव

अवमानाचे राजकारण उच्च पातळीवरूनच – मुख्यमंत्री

पंतप्रधानांच्या सार्वजनिक कार्यक्रमात हुल्लडबाजी करून मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा हे उच्च पातळीवरून ठरवून केलेले राजकारण असल्याचा आरोप शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बठकीत केला.

महायुतीत गटचर्चा, घटक पक्षांमध्ये मात्र अस्वस्थता

विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत शिवसेना-भाजपचे काही नेते घटक पक्षांशी स्वतंत्रपणे वाटाघाटी करीत आहेत. परंतु निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते, तरीही अजून जागावाटपाबाबत एकत्रित अशी ठोस चर्चा होत

उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितल्याच्या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे.

विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या निर्णयाचे सुमित्रा महाजन यांच्याकडून समर्थन

काँग्रेस पक्षाला लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद नाकारण्याचा निर्णय नियम आणि परंपरा यांच्या आधारेच घेण्यात आला असल्याचे जोरदार समर्थन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले.

फुटीर शक्तींना दोष देऊ नका, मोदींचीच भूमिका कठोर -मलिक

काश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेवर जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडीचे नेते यासिन मलिक यांनी जोरदार टीका केली आहे.

संघ पूर्वीपेक्षा अधिक अर्निबध -मायावती

बसपाच्या नेत्या मायावती यांनी शनिवारी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची कामगिरी निराशाजनक असून हे सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

वादग्रस्त वक्तव्य मागे घेण्यास जगनमोहन यांचा नकार

आंध्र प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते जगनमोहन रेड्डी यांनी सभागृहात असंसदीय शब्द वापरल्याने निर्माण झालेला तिढा शनिवारीही कायम होता.

हरयाणा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी अजय यादव

हरयाणातील भूपिंदरसिंग हुडा मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन त्यानंतर तो मागे घेणारे मंत्री अजय यादव यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, तर नवीन जिंदाल यांच्याकडे प्रसिद्धी समितीचे अध्यक्षपद

सरकारी प्रकल्पांच्या नितीशकुमारांच्या हस्ते उद्घाटनाला हरकत

सरकारी हॉस्पिटलमधील सुविधांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते करण्यात येत असल्याच्या प्रकारांना बिहारमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र हरकत घेतली आहे.

राणेंना आता काँग्रेस संस्कृती अवगत!

काँग्रेस संस्कृतीत नेतृत्वाचे गुणगान गायचे किंवा नेतृत्वाचे चुकले तरीही ब्र काढायचा नाही ही कला नारायण राणे यांना अगदी गेल्या महिन्यापर्यंत बहुधा अवगत नसावी.

पुणे, मुंबई मेट्रो राज्य सरकारमुळेच रखडली

पुणे मेट्रो प्रकल्प आणि मुंबई मेट्रो (तिसरा टप्पा) हे प्रकल्प राज्य सरकारने आवश्यक बाबींची पूर्तता न केल्यानेच रखडले असल्याचे स्पष्ट करीत पुणे मेट्रोला लवकरच मंजुरी देण्याची ग्वाही केंद्रीय नगरविकास

पवार, तटकरेंच्या चौकशीसाठी एसीबीच्या हालचाली

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांविरुद्ध सिंचन प्रकल्पांतील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल खुली चौकशी करण्याची परवानगी भ्रष्टाचार

राज्यात डावे-भारिपची तिसरी आघाडी?

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेनाला पर्याय देण्यासाठी भारिप-बहुजन महासंघ, शेकाप, भाकप, माकप, जनता दल, समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे काही गट यांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली

Just Now!
X