महाविद्यालयाच्या नियतकालिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिटलर, लादेन या ‘नकारात्मक चेहऱ्यांच्या’ पंगतीत दर्शविणाऱ्या केरळमधील शासकीय तांत्रिक महाविद्यालयाच्या विद्यार्थी, प्राचार्यासह सात जणांवर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आह़े अवमानकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी संबंधित विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राचार्य क्रिष्णन कुट्टी, संपादक गोपी आणि छापखाना मालक यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ ‘नकारात्मक चेहरे’ या पानावर नरेंद्र मोदी,अॅडॉल्फ हिटलर,चंदनतस्कर विरप्पन, एलटीटीईचा प्रमुख प्रभाकरन, ओसामा बिन लादेन आणि जॉर्ज बुश यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत़
स्मृती इराणींचे ‘ऑल इज वेल’
नवी दिल्ली : मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी पुढील आठवडय़ात उमेश शुक्ला यांच्या ऑल इज वेल या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहेत. हिमाचल प्रदेशात हे चित्रीकरण होईल. हृषी कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे बऱ्यापैकी चित्रीकरण स्मृती यांनी केल्याचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी सांगितले. मंत्री आणि कलाकार अशा दोन भूमिकांमध्ये संघर्ष होण्याचा प्रश्न नाही, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले. स्पष्ट केले. स्मृती इराणी यांनी या चित्रपटात हृषी कपूर यांच्या पत्नीची आणि अभिषेकच्या आईची भूमिका साकारली आहे. स्मृती या मंत्री झाल्या म्हणून कथानकामध्ये काही बदल करणार नाही, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2014 रोजी प्रकाशित
मोदींना हिटलर, लादेनच्या पंगतीत बसवले; सात जणांविरुद्ध गुन्हा
महाविद्यालयाच्या नियतकालिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिटलर, लादेन या ‘नकारात्मक चेहऱ्यांच्या’ पंगतीत दर्शविणाऱ्या केरळमधील शासकीय तांत्रिक महाविद्यालयाच्या विद्यार्थी,
First published on: 11-06-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Short politics political news