महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकाल यांनी निकाल जाहीर केला आहे. राज्याचा यंदाचा निकाल हा ९९.६३ टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्यव एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.६३ टक्के आहे.
सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल हा ९९.८१ टक्के लागला आहे. हा निकाल इतर विभागापेक्षा सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल हा ९९.३४ टक्के लागला आहे. तर यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थीनींचा निकाल ९९.७३ टक्के लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल हा ९९.५४ टक्के लागला आहे. विद्यार्थींनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.१९ टक्क्यांनी अधिक आहे.
Maharashtra HSC Result 2021: ‘या’ चार वेबसाईटवर पाहता येणार निकाल; जाणून घ्या निकाल कसा पाहाल
तक्रारींच्या निराकरणासाठी..
अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केलेल्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांच्या निराकरणासाठी मंडळाच्या स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या अनुषंगाने राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळाच्या स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी टपाल, ई मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदवता येईल. त्यासाठीच्या अर्जाचा नमुना, तक्रारींचे निराकरण करण्यासाठीच्या अधिकाऱ्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई मेल पत्ता आदी माहिती राज्य मंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तक्रारीचा अर्ज केल्यानंतर दहा दिवसांत त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
कुठे पाहाल निकाल
https://hscresult.net
11admission.org.in
https://msbshse.co.in
maharesult.nic.in
hscresult.mkcl.org
Highlights
https://hscresult.11thadmission.org.in
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
यापैकी एका वेबसाईटला भेट द्या त्यानंतर खालील स्टेप फॉलो करा
> वरीलपैकी एका वेबसाईटवर जा
> वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
> आसनक्रमांक टाका
> विचारलेली योग्य माहिती द्या (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)
> निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
> निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल
दहावीच्या निकालावेळी मंडळाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना कित्येक तास त्यांचा निकाल पाहता आला नव्हता. त्यामुळे मंगळवारी जाहीर होणाऱ्या इयत्ता बारावीच्या निकालासाठी बोर्डाने चार नव्या वेबसाईटची स्वतःहून दिल्या आहेत. त्यामुळे एकाच वेबसाईटवर लोड येणार नसून विद्यार्थ्यांना निकाल पाहणं आणखी सोपं जाणार आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने इयत्ता बारावीचा निकाल लागणार आहे. सविस्तर वाचा
राज्य मंडळातर्फे बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांसाठी दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. यामध्ये ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. सविस्तर वाचा..
राज्यातील एकूण विद्यार्थी १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यापैंकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण विभागाने मूल्यमापनासाठी दहावी साठी ३० टक्के, अकरावी साठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी केली होती. त्यानुसार यंदाच्या निकालात १२ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत तर ४७८९ विद्यार्थी नापास झाले आहेत
महाराष्ट्र सरकारने करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने जाहीर केला होता. महाराष्ट्र सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दहावी साठी ३० टक्के, अकरावी साठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार यंदाच्या निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत ८.९७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पुणे ९९.७५
नागपूर ९९.६२
औरंगाबाद ९९.३४
मुबंई ९९.७९
कोल्हापूर ९९.६७
अमरावती ९९.३७
नाशिक ९९.६१
लातूर ९९.६५
कोकण ९९.८१
सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थीनींचा निकाल ९९.७३ टक्के लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल हा ९९.५४ टक्के लागला आहे. विद्यार्थींनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.१९ टक्क्यांनी अधिक आहे.
सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल हा ९९.८१ टक्के लागला आहे. हा निकाल इतर विभागापेक्षा सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल हा ९९.३४ टक्के लागला आहे.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापू, अमरावती, नाशिक, लातूर आणइ कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्यव एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.६३ टक्के आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात येत करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकाल यांनी निकाल जाहीर केला आहे.
शाखेनिहाय निकाल
विज्ञान शाखा - ९९.४५ टक्के
कला शाखा - ९९.८३ टक्के
वाणिज्य शाखा - ९९.९१ टक्के
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम - ९८.८० टक्के
बारावीच्या निकालात इयत्ता दहावीच्या गुणांना ३० टक्के भारांश असेल. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील. तर इयत्ता अकरावीचा ३० टक्के भारांश असणार आहे. इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण बारावीच्या निकालात देण्यात येणार आहेत. तर इयत्ता बारावीसाठी ४० टक्के भारांश असेल. बारावीच्या वर्गासाठी ४० टक्के भारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.
महाराष्ट्र सरकारने केरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने जाहीर केला होता. महाराष्ट्र सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दहावी साठी ३० टक्के, अकरावी साठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.