शिवसेनेत आहे म्हणजे माज, मस्ती पाहिजेच. मग कोणी माजोरडा म्हणो, गुंड म्हणो किंवा मवाली….हे वक्तव्य आहे कायम चर्चेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत. अहमदनगरच्या एका सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आणि शिवसैनिकांच्या टाळ्या घेतल्या. शिवसेना म्हणजे पॉवर, सत्ता. नरेंद्र मोदीसुद्धा समोरुन जाताना माझी विचारपूस करतात, असंही ते या सभेवेळी म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखं जन्माला आलो, वाघासारखं मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या”, असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा – “मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात सत्ता, पॉवर”- संजय राऊत

ते म्हणाले, शिवसेनेत माज असायलाच पाहिजे. मग कोणी माजोरडा म्हणो गुंड म्हणो किंवा मवाली. मला कितीतरी जण म्हणतात की हा गुंड आहे मवाली आहे. बाळासाहेब पण म्हणायचे आमची मवाल्यांची संघटना आहे. आम्ही मवाली होतो म्हणून महाराष्ट्र टिकला, आम्ही मवाली होतो म्हणून १९९२ साली हिंदुंचं रक्षण झालं.

आणखी वाचा – ‘नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाहीत, तर…’; संजय राऊतांनी राणेंना काढला चिमटा

राऊत पुढे म्हणाले,  सत्ता हा मानसिक आधार असतो. मी समोरुन जात असताना मोदी थांबून म्हणतात कैसे हो भाई? याला म्हणतात सत्ता, पॉवर. सुरुवातीच्या काळात आम्ही हातात मार्मिक ठेवायचो. मार्मिक दिसला की लोक समजायचे पॉवर आहे, शिवसैनिक आहे, मग बसायला जागा मिळायची. कारण त्यांना कळायचं की हा शिवसैनिक आहे. मग गुजराती लोकदेखील सामना पेपर सोबत ठेवायला लागले. ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, तेही संरक्षणासाठी सामना सोबत ठेवायला लागले. शिवसेना हे सगळ्यांचं प्रोटेक्शन आहे. याला म्हणतात पॉवर.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut said shivsena member should be dashing even if some people call them don vsk
First published on: 31-07-2021 at 17:30 IST