Petrol Diesel Price In Marathi : आज ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल व डिझेलच्या किंमती ठरवतात. देशात तेलाच्या किंमती देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवल्या जातात. पण, आज महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price )

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.१७९०.७१
अकोला१०४.११९०.६८
अमरावती१०४.५५९१.१०
औरंगाबाद१०५.३७९१.८६
भंडारा१०४.५७९१.१२
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०४.६८९१.२२
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.०४९०.५९
गडचिरोली१०४.४९९२.००
गोंदिया१०५.५५९२.०९
हिंगोली१०५.४०९१.९१
जळगाव१०५.५०९२.०३
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.४१९०.९६
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.६१९१.१५
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७५९१.२६
उस्मानाबाद१०५.५१९१.०५
पालघर१०४.०३९०.५४
परभणी१०५.४९९२.०२
पुणे१०३.४४९०.९६
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.४५९१.००
सातारा१०४.८९९१.३९
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.५८९१.११
ठाणे१०३.८०९०.३१
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.८९९१.४२
यवतमाळ१०५.५०९२.०३

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे रायगड, सातारा, सोलापूर या शहरांत पेट्रोलच्या तर अहमदनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, धुळे,उस्मानाबाद या शहरांत डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे दिसून आले आहे. तर तुम्ही सुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तपासून घ्या. तसेच तुम्ही घरबसल्या सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तपासू शकता.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

तुम्हीसुद्धा कार इन्शुरन्स रिन्यू करण्याकडे दुर्लक्ष करता का?

अनेक कारमालक त्यांच्या विमा पॉलिसी (कार इन्शुरन्स) रिन्यू करण्याकडे दुर्लक्ष करतात. तुमच्या कारचा विमा रिन्यू करण्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, जे दंड भरण्यापलीकडेसुद्धा जाऊ शकतात.कार इन्शुरन्स पॉलिसी जर रिन्यू केली नसेल, तर तुम्ही बेकायदा वाहन चालवीत आहात. कारण- सप्टेंबर २०१८ पासून थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक करण्यात आलं आहे. वाहनचालकांनी कारसाठी तीन वर्षांचे आणि दुचाकीसाठी पाच वर्षांचे थर्ड पार्टी कव्हर आठवणीने घ्यावे तर थर्ड पार्टी विमा वेगळा घ्यावा लागतो हे लक्षात ठेवा. भारतात रस्त्यावरील प्रत्येक वाहनाला किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. जर तुमचा विमा संपला असेल, तर तुम्हाला दंडासह कायदेशीर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 february 2025 petrol diesel rate in maharashtra check out other city rates given below chart asp