शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ठाकरे गटातील नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख घटनाबाह्य मुख्यमंत्री असा केला जातो. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. मी माझ्या मतदारसंघातून राजीमाना देतो. माझ्याविरोधात निवडणूक लढवा. तुम्ही कसे निवडून येतात ते मी बघतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते एका जाहीर सभेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ताजा असताना कर्नाटक सरकारची मोठी घोषणा, १०० कोटी निधी देत मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले…

“मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलेलं आहे. मी वरळीतून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. तुम्ही कसे निवडून येता ते मी बघतो. जी यंत्रणा लावायची आहे ती लावा. जी ताकद लावायची आहे ती लावा. जेवढे खोके वाटायचे आहेत तेवढे वाटा,” असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. तसेच एकही मत विकले जाणार नाही. मी त्यांना पाडणारच, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री स्वत:ला क्रांतीकारी समजतात. ३२ वर्षांचा एक तरूण मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आव्हान स्वीकारावे. क्रांतीकारकाने कधीही घाबरायचे नसते,” असे राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray challenges eknath shinde to contest assembly election against him prd