कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी वेगळे मराठा आरक्षण देणार, अशी घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर मराठा आरक्षणासाठी १० फेब्रुवारी पासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालाचे आणि त्यानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत केले. आज मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे, त्यांच्यासाठीही गोरगरिब मराठा समाज लढला, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. तसेच मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळत असलं तरी जोपर्यंत सगेसोयऱ्याचा कायदा होत नाही, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे, त्या पार्श्वभूमीवर २० फेब्रुवारीपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असून अधिवेशनात काय निर्णय होतो, हे पाहून पुढची भूमिका ठरविली जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे सांगितले.
सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण चालू ठेवणार; मनोज जरांगे पाटील यांची ठाम भूमिका
Manoj Jarange Patil Hunger Strike : २० फेब्रुवारी पर्यंत उपोषण चालूच ठेवणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सगेसोयऱ्याच्या प्रमाणपत्राची अंमलबजावणी व्हावी, अशी मागमी त्यांनी केली आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-02-2024 at 13:41 IST
TOPICSमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservationमराठा समाजMaratha Community
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation will continue until the implementation of saga soyares says manoj jarange patil kvg