आगामी ‘केसरी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखापत झाली आहे. एका साहसदृष्याचं शूटिंग करताना अक्षयच्या बरगडी आणि छातीला मार लागला. अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटिंग गुरुवारी पूर्ण होणार होतं. मात्र, अक्षयला दुखापत झाल्याने पुढील काही दिवस टीमला वाट पाहावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साताऱ्यातील वाठार इथं महत्त्वपूर्ण साहसदृष्यांची शूटिंग पार पडत होती. त्याचदरम्यान अक्षय थेट छातीवर आपटला. यामुळे त्याच्या बरगडी आणि छातीला किरकोळ मार लागला. त्याच्यावर तात्काळ उपचारही करण्याच आले. उपचारानंतर डॉक्टरांनी अक्षयला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे सेटवर खासगी विमानाचीही सोय करण्यात आली आहे, जेणेकरून अक्षयला पुढील उपचारासाठी मुंबईला आणता येईल. मात्र, खिलाडी कुमारने तसं करण्यास नकार दिला असून शूटिंग पूर्ण करूनच मुंबईतला परतणार असल्याचं सांगितलं.

वाचा : अभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात शूटिंगसाठी मुक्कामाला आहे. काही दिवसांपूर्वीच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘केसरी’च्या सेटवर जाऊन अक्षयची गळाभेट घेतली होती.

https://twitter.com/DelhiAkkians/status/984468216641536000

ऐतिहासिक घटनेवर प्रकाशझोत टाकत ‘केसरी’ साकारला जाणार आहे. १८९७ मध्ये लढल्या गेलेल्या सारागढीच्या युद्धातील ३६व्या शीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांची शौर्यगाथा या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. २२ मार्च २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar injured on kesari sets refuses to return to mumbai