खासदार उदयनराजे भोसले यांना सगळा महाराष्ट्र छत्रपती उदयनराजे या नावाने ओळखतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. सध्या ते भाजपाचे खासदार आहेत. त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि बोलण्याच्या खास शैलीसाठी उदयनराजे ओळखले जातात. मध्यंतरीच्या काळात राज्यपालांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान झाला त्यावेळी उदयन राजेंनी आंदोलन उभं केलं होतं.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली प्रक्रिया आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या प्रयत्नांबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि उदयनराजे यांची भेट झाली
मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी बाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने उदयनराजे…