राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे धर्मविरोधी आहेत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली होती. या टीकेला अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी आस्तिक आहे की नास्तिक हे ठरवण्याचा अधिकावर फक्त मला आहे. राज्य घटनेने मला ते अधिकार दिले आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – “अमोल मिटकरी रोज दाढीला तेल लावून…”, संजय राऊतांचं नाव घेत शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी!
“अमोल मिटकरी हा सर्वसामान्य वारकरी कुटुंबात जन्मला आहे. माझ्या घरी गेल्या तीन पिढ्यांपासून गणेशोत्सव सुरू आहे. काही लोक माझ्यावर आजही टीका करतात, मला धर्मविरोधी म्हणतात. मात्र, त्यांच्याकडे आजही दीड दिवसाचा गणपती बसतो. मात्र, मी पूर्ण दहा दिवसाचा गणपती बसवतो” , असे प्रत्युत्तर त्यांनी टीकाकारांना दिले आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – कंत्राटी मुख्यमंत्र्यांच्या टीकेवरून नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची…”
पुढे ते म्हणाले, “काही लोकांनी काही लोकांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला आहे, अशा लोकांना माझ्यावर बोलायचा अधिकार नाही. मी आस्तिक आहे की नास्तिक हे ठरवण्याचा अधिकावर फक्त मला आहे. राज्य घटनेने मला ते अधिकार दिले आहे”