लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे. भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धारही भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. अशात आता अशोक चव्हाण यांच्या भाजपासाठीच्या सभाही चर्चेत आहेत. अशोक चव्हाण भाजपाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी नांदेडमध्ये केलेलं भाषण चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले अशोक चव्हाण?

भाजपाचे जुने लोक आणि काँग्रेसमधून आज भाजपात सहभागी झालेले लोकही आहेत. त्यामुळे आता आपली ताकद डबल होणार आहे. डबल ताकद झाली की मग किसी को देखने की जरुरत नहीं. प्रतापराव और हम अलग थे. सात, दस साल से वो मुझे और मै उनको पानी मे देखते थे. अब हम दोने एकसाथ आ गये. अशोक चव्हाण की ऐसी आदत नहीं की सामनेंसे एक और पिछे एक. जो मै बोलता हूँ वो मै करके दिखाता हूँ. विकासाचं काम असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न. मी आश्वासन पाळणारा माणूस आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- अशोक चव्हाणांचा महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्याचा प्लॅन; नाना पटोलेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

अशोक चव्हाण यांनी रावडी राठोड स्टाईल अंदाजात म्हटलेला हा डायलॉग चर्चेत आला आहे. अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसची साथ सोडून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर महाविकास आघाडीने त्यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र मी कुणाच्याही टीकेला उत्तर देणार नाही. पक्षासाठी निष्ठेने काम करणार आणि पुढे जाणार अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan loksabha election campaign public meeting filmy style scj