राहाता: साईबाबांच्या समकालीन भक्त, लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टने १६ मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मावाटप शिबिराचा आतापर्यंत १६ हजांरापेक्षा जास्त गरजू रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला. २ हजार ९० रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शंकरा आय रुग्णालय (पनवेल, मुंबई) येथे पार पडल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी दिली.
साईबाबांच्या समकालीन भक्त कै. लक्ष्मीबाई शिंदे यांची नात श्रीमती शैलजाताई शिंदे-गायकवाड यांनी साईबाबांनी सुरू केलेल्या रुग्णसेवेचा वसा, साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टकडून सुरू आहे. पुढील १७ व्या मोफत शिबिराचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले. लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टने १६ व्या शिबिरात जवळपास १ हजार ४०० रुग्णांची मोफत तपासणी करून गरजूंना मोफत चष्मावाटप केले व ४० रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे नेण्यात आले. डॉ. प्रकाश पाटील व डॉ. एस एस. सौम्यश्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
खासगी रुग्णालयात ज्या नेत्र शस्त्रक्रियेसाठी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. तो आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णांना परवडत नसल्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे काम करण्यात येते. याच बरोबर शिर्डी येथील साईनाथ विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यी व शिर्डी परिसरातील अपंग व्यक्तींना सायकलचे वाटप करण्यात आले आहे. –श्री साईराज गायकवाड, संचालक, साईनाईन ग्रुप, शिर्डी