"तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपने तुम्हाला...," भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका | BJP Leader Amit Satam on Shivsena Aditya Thackeray Maharashtra Government sgy 87 | Loksatta

“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका

तुमच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे, आदित्य ठाकरेंना टोला

“तुमच्या कतृत्वामुळे १२ हजार कोटींचा दंड, पितृकृपेने तुम्हाला…,” भाजपा नेत्याची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका
तुमच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे, आदित्य ठाकरेंना टोला (File Photo: PTI)

विश्वासघाताने युतीधर्म तोडून, हिंदुत्वाशी तडजोड करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पितृकृपने पर्यावरण खात्याचे मंत्रीपद तुमच्या पदरात पडले होते. पर्यावरण खात्याचं मंत्रीपद मिळवण्यासाठी आपलं कर्तृत्व काय होतं? अशी विचारणा भाजपा आमदार अमित साटम यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना केली आहे. आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

“तुम्ही मंत्रीपदावर असताना केलेल्या ‘कर्तृत्वामुळे’ आता न्यायालयानेच राज्य सरकारला तब्बल १२ हजार कोटी दंड ठोठावला आहे. त्यासाठी तुमचे अभिनंदन,” अशी उपरोधिक टीका अमित साटम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

“मुंबईकरांच्या जीवाला हानिकारक असलेला घनकचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्याने हरित लवादने महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या पीठाने मागील आठवड्यात हे आदेश दिले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“एकप्रकारे तुमच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईसाठी क्लायमेट ॲक्शन प्लॅनच्या भूलथापा मारण्याशिवाय आणि जनतेच्या पैश्यावर परदेश दौरा करण्याशिवाय आपण काहीही साध्य केले नाही. मलमिश्रीत काळेपाणी समुद्रात सोडून मुंबईच्या समुद्राला मात्र तुम्ही काळासमुद्र करून दाखवले. आपले कर्तृत्व एवढेच की ‘बॅल्क सी’ पाहण्यासाठी मु्बईकरांना युरोपात जाण्याची गरज नाही कारण तो आपण मुंबईकरांना इथेच दाखवला आहे,” असा टोला अमित साटम यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पंकजा मुंडे प्रकरण: “एका सहकाऱ्याची राजकीय हत्या करून…”; प्रकाश महाजनांचा भाजपाला इशारा

संबंधित बातम्या

“…म्हणून शिवसेनेचं सरकार घालवण्यात आलं”, संजय राऊतांचं मोठं विधान, शिंदे सरकारला केलं लक्ष्य!
VIDEO: भाषण करताना स्टुलवर उभे राहिल्याने मनसेची टीका, सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “माझ्या पायाखाली…”
VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
Maharashtra Breaking News Live : सीमाप्रश्नावर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा; वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर!
विश्लेषण: समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचे मुहूर्त का हुकले? तो कधी पूर्ण होणार?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आधी निषेध मग लग्न! खराब रस्त्याला कंटाळलेला नवरदेव लग्न सोडून थेट आंदोलनात पोहचला
Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, मग…”; सीमाप्रश्नावरून रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी! साखर खाणं सोडाच, पण या पदार्थांचं सेवन करणंही तितकच घातक
उत्तर कोरिया: के-ड्रामा, अमेरिकी चित्रपट पाहिले म्हणून विद्यार्थ्यांना भरचौकात मृत्यूदंड; शिक्षा पाहणं स्थानिकांना केलं बंधनकारक कारण…