भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राच्या प्रभारी अंजली दमानिया यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
आपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या जम्मू आनंद यांनी नितीन गडकरी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पक्षाने त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून महत्त्व दिले नाही. मात्र, गेल्या काही दिवसात अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांनी गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांना बदनाम करणे सुरू केले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-02-2014 at 02:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp youth morcha launch complaint against kejriwal and anjali damania