सावंतवाडी : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला पुतळ्याचा शिल्पकार व मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला आज मालवण येथील न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार त्याची रवानगी सावंतवाडी येथील उपजिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटील याने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

आणखी वाचा-पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या बंगल्यासमोर गोळीबार

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना दि.२६ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला दि.१३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा पोलीस बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला दि.२४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार त्याची रवानगी सावंतवाडी येथील उपजिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

आणखी वाचा-Pankaja Munde: “राहुल गांधींबाबत मनोज जरांगे पाटील…”, पंकजा मुंडेंचं टीकास्र; ‘या’ विधानावरून केलं लक्ष्य!

या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यादरम्यान त्याने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.