भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीत १९पैकी १२ जागा जिंकून काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली. पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया घुमनवाड मात्र पराभूत झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, तर भाजप व अपक्षांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व आमदार अमिता चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यातील या निवडणुकीने जिल्हय़ाचे लक्ष वेघून घेतले होते. काँग्रेसचे गोविंद बाबागौड कोंडलवार, माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांची पत्नी संगीता, पत्रकार मनोजकुमार गिमेकर, भाजपच्या उषा घिसेवाड आदी प्रमुख उमेदवार विजयी झाले, परंतु भाजपचे नेतृत्व करणारे नागनाथ घिसेवाड यांचा पराभव झाला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2015 रोजी प्रकाशित
भोकर पालिकेत काँग्रेसचीच सत्ता
भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीत १९पैकी १२ जागा जिंकून काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली. पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया घुमनवाड मात्र पराभूत झाल्या.
First published on: 24-04-2015 at 03:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress wins bhokar sivic polls