सांगली : घरासाठी व शेतासाठी रस्ता मिळू शकत नाही या कारणातून विट्यातील एका दांपत्याने समाज माध्यमातून आपली कैफियत मांडत आत्महत्येचा प्रयत्न सोमवारी केला. दोघांनाही खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृर्ती चिंताजनक आहे. प्रशांत कांबळे या तरूणांने सोमवारी फेसबुक या समाज माध्यमावर थेट संवाद साधत आपली कैफियत  मांडत असताना सांगितले, घरात व शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर पत्र्याचे शेड मारण्यात आले असून वाट मिळावी यासाठी आपण कायदेशिर मार्गाने प्रयत्नशील असतानाही आपणास  न्याय मिळत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील बीआरएसच्या वाटेवर ?

या कारणातून आमचे जगणे कठीण झाल्याने आणि वरिष्ठ पातळीवर न्याय मागण्यासाठी आर्थिक स्थिती पुरेसी नसल्याने आपण पत्नी स्वाती हिच्यासह आत्महत्या करीत असल्याचे सांगत विष प्राशन करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही माहिती मिळताच दोघांनाही ओमश्री रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांचीही प्रकृर्ती चिंताजनक आहे. याबाबत विटा पोलीस ठाण्यात मात्र अद्याप  नोंद करण्यात आलेली नव्हती. या प्रकारामुळे विटा शहरात खळबळ माजली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple attempt suicide by drinking poison after communicating on facebook zws