गावातील पाटलांचा मान राखत नाही या कारणावरून तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे दलित समाजातील काहीं जणांना मारहाण करण्यात आली. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला. वामन सुबराव न्यायनिर्गुणे असे या वृद्धाचे नाव आहे. या याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की बोरगाव येथील सवर्ण जातीतील काही तरुणांनी गावातील काही दलितांना आमचा, तसेच गावच्या पाटलांचा मान ठेवत नाही म्हणून मारहाण केली. यामध्ये न्यायनिर्गुणे यांच्या मेव्हण्यालाही मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या न्यायनिर्गुणे यांना या तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही घटना समजताच गुन्ह्य़ाची नोंद करून दोघांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी तासगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2015 रोजी प्रकाशित
गावातील मानपानातून तासगावमध्ये दलिताची हत्या
गावातील पाटलांचा मान राखत नाही या कारणावरून तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे दलित समाजातील काहीं जणांना मारहाण करण्यात आली.
First published on: 19-07-2015 at 08:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalit killed in sangli