अतिरिक्त मुख्य सचिव पदावर असलेल्या देबाशिष चक्रवर्ती ( Debashish Chakraborty ) यांना राज्याच्या मुख्य सचिव ( State Chief Secretary ) पदाचा अतिरिक्त भार सोपावण्यात आला आहे. राज्य सरकारने मुख्य सचिव पदी असलेल्या सीताराम कुंटे ( Sitaram Kunte ) यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न केले होते, मात्र केंद्र सरकारने राज्य सरकारची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे चक्रवर्ती याच्याकडे मुख्य सचिव पदाची अतिरिक्त जबावदारी देण्यात आली आहे. चक्रवर्ती हे भारतीय प्रशासन सेवेतील १९८६ तुकडीतील एक वरिष्ठ अधिकारी आहेत. चक्रवर्ती यांना मुख्य सचिव पदावर कायम केल्यास त्यांना जेमतेम ४ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे, कारण फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांच्या सेवेचा कालावधी संपणार आहे. तेव्हा चक्रवर्ती यांना मुख्य सचिव पदावर कायम केलं जातं, का आणखी कोणाची नियुक्ती केली जाते हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीताराम कुंटे यांची फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती. सीताराम कुंटे यांनी मुंबई पालिकेत अतिरिक्त आयुक्त तसंच आयुक्तपदी काम केले होते. त्यामुळे मुख्य सचिव पदी नेमणूक करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुंटे यांनी पसंदी दिली होती. त्यामुळेच मुख्य सचिव पदाची तीन महिन्यांची मुदतवाढ न मिळाल्यामुळे पदावरुन निवृत्त होताच कुंटे यांची तात्काळ मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debashish chakraborty has been appointed as the chief secretary of the state asj
First published on: 30-11-2021 at 20:06 IST