राज्यातील करोनाबाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली असून रिकव्हरी रेट ९५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याच्या आऱोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज २,५८५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तसेच नवीन १,६७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण १९,२९,००५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या ४५,०७१ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.१९ टक्के झाले आहे.

दरम्यान, पुणे शहरात दिवसभरात १९२ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २३८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १०१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६३१ एवढी आहे.