उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. फडणवीसांनी ठाकरेंच्या पाटणामधील बैठकीला हजेरी लावण्यावरून टीका केली. यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना उत्तर देत कुटुंब तुम्हालाही असल्याचा सूचक इशारा दिला. यावर पुन्हा फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एका ट्वीटचा उल्लेख करत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते रविवारी (२५ जून) नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
“उद्धव ठाकरेंना उत्तर देणाऱ्या त्या ट्वीटने सर्व विक्रम मोडले”
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना एका ट्वीटने उत्तर दिलं. त्या ट्वीटला मिळालेल्या पाठिंब्याने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. त्यावरून तरी उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला हवं की, लोकांना काय अपेक्षित आहे.”
व्हिडीओ पाहा :
फडणवीसांनी उल्लेख केलेलं ट्वीट कोणतं?
हेही वाचा : VIDEO: “देवेंद्र फडणवीसांनी या माजी मुख्यमंत्र्यांना अनेकदा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा
“”सगळीकडेच भाजपात पक्षप्रवेश, कारण…”
“सगळीकडेच भाजपात पक्षप्रवेश होत आहेत. कारण मोदींच्या नेतृत्वावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. आत्ताच लोकांनी अमेरिकेतील मोदींची भेट बघितली. भारताच्या पंतप्रधानांना अमेरिकेत असं समर्थन मिळणं हा त्या व्यक्तीचा सन्मान नाही, तर देशाचा सन्मान आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं.
“हा मोदींचा नव्हे तर हा भारताचा सन्मान”
“मोदी हे निमित्त आहे, हा मोदींचा सन्मान होत नसून हा भारताचा सन्मान होत आहे. अमेरिकेची भरगच्च संसद मोदींसाठी उभे राहून टाळ्या वाजवते. त्यावेळी भारताचा सन्मान होतो,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.