अकोला : शिवसेनेच्या आमदारांमध्ये अंतर्गत खदखद आहे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे आमच्यावर प्रेम व आशीर्वाद असावे, ही प्रत्येकाची भावना असते. आजही पक्षाच्या विरोधात कुणी गेलेले नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना वेळ मिळत नाही. पत्र दिले तर पत्राला उत्तरदेखील देत नाहीत, अशा शब्दात बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करीत थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार गायकवाड यांनी भ्रमणध्वनीवरून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपसोबत कुठलाही आमदार जाणार नाही. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्हीच निर्णय घ्या, मला मंत्रिपद मिळाले नाही तरी चालेल, असे सांगितले आहे. या लोकांना सोडा आणि आपली सत्ता स्थापन करा, अशी आमची मागणी आहे. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत, शिवसेना कधीही सोडणार नाही. राजकारणात कोणी कोणाचे कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात. भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास सर्वच आमदार संमती देतील, असेही आ. गायकवाड यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dissatisfied with working chief minister mla sanjay gaikwad shiv sena uddhav thackeray amy