सोलापूर : तृतीयपंथीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून सकारात्मक प्रयत्न होत असताना दुसरीकडे समाजात अजूनही तृतीयपंथीयांना चांगली वागणूक मिळत नाही. त्यांच्याबद्दल तिटकारा दिसून येतो. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत अमेरिकेच्या तोसवान विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. पल्लवी गुहा यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेस सुरुवात झाली. या परिषदेचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे डॉ. पल्लवी गुहा यांनी केले. त्या वेळी त्या बोलत होत्या. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन सत्रास समाजसेवक ब्रिजमोहन खोफलिया, डॉ. सानवी जेठवाणी, पहिले तृतीयपंथीय सरपंच ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कांबळे, सचिन वायकुळे आदी उपस्थित होते. या परिषदेत २५० प्रतिनिधींचा सहभाग आहे.

डॉ. पल्लवी गुहा म्हणाल्या, ‘समाजात तृतीयपंथीयांचे जीवनमान सरकार, प्रशासन, संशोधक आणि अभ्यासक बदलू शकतात. परंतु तसे ठोस प्रयत्न होताना दिसून येत नाही. त्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजिलेली तृतीयपंथीयांची परिषद पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कुलगुरू प्रा. महानवर यांनी, पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत या तृतीयपंथीयांच्या परिषदेचे आयोजन केले असून, विद्यापीठात तृतीयपंथीयांना पदवी आणि संशोधनापर्यंत उच्च शिक्षण मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले. या वेळी डॉ. सानवी जेठवाणी, सचिन वायकुळे, माउली कांबळे आदींचे भाषण झाले. या वेळी विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजा सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. अंबादास भासके उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr pallavi guha stated social media plays crucial role in integrating third parties into society sud 02