खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ धक्कादायक घटना घडली असून बस चालवित असतानाच बस चालकाला चक्कर आली. शेजारीच असणाऱ्या वाहकाने प्रसंगावधान राखत बसचे सारथ्य आपल्या हातात घेत बसवर ताबा मिळवला. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल ३० जणांचे प्राण वाचले आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती. परंतू ती येत असतानाच चालकाला अचानकच चक्कर आली. अचानक असे काय झाले म्हणून बसमधील सर्व प्रवाशी भयभीत झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरने बसचा ताबा घेतला व बस बाजूला घेतली. तात्काळ त्याच अवस्थेत बस चालवित भिवघाट येथे आणण्यात आली. सदरच्या चालकावर त्वरीत उपचार करण्यात आले. सध्या बसचा चालक सुखरुप असून या घडलेल्या घटनेने माञ प्रवाशांची मोठी दैना उडाली होती.
First published on: 11-12-2022 at 10:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driving the bus bhivaghat khanapur driver got dizzy but conductor saved the lives of the passengers chiplun parali bus sangli tmb 01