Avimukteshwaranand : महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात गायीला राजमाता घोषित करण्याचे धाडसी काम केले आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आदर केला जाईल. ब्रह्मलीन शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांची यांची जयंती भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया दिवशी मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. यानिमित्ताने, ज्योतिषपीठाधिश्वर, विद्यमान शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे चांदीच्या पानांच्या पुस्तकावर एकनाथ शिंदे यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिणार आहेत. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ही घोषणा केली.
काय म्हणाले शंकराचार्य?
गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती देशभर मोहीम चालवत आहेत. या संदर्भात त्यांनी ३३ कोटी गो-प्रतिष्ठा महायज्ञ देखील सुरू ठेवला आहे. अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, गायीला राष्ट्रमाता घोषित करण्याची त्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मान्य केली होती. हे त्यांचे ऐतिहासिक काम आहे. हे काम भारत सरकारनेही करायला हवे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, भारताच्या राष्ट्रीय चिन्हावरही बैलाची आकृती आहे. हे देशाने मान्य केले आहे.
सेंगॉलवरही गायीचं चिन्ह आहे-शंकराचार्य
शंकराचार्य म्हणाले की, देशाच्या नवीन संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या सेंगॉल घेऊन जात होते त्यावर एक त्या सेंगॉलच्या वरच्या भागात एक जागा आहे, ज्यावर गायीची मूर्ती आहे. संसद भवनात प्रवेश करणारी ही पहिली व्यक्ती होती. याचा अर्थ असा की नवीन संसद भवनात प्रवेश करणारी गाय माता पहिली होती. शंकराचार्य म्हणाले की हे खूप शुभ आहे, परंतु याच संसद भवनात गायींची कत्तल करण्याची परवानगी दिली जाते तेव्हा ते दुःखद असते. गोमांस विकले जाते. सनातन धर्मासाठी ही खूप दुःखद गोष्ट आहे. बोरिवली येथील कोरा सेंटरमध्ये आयोजित चातुर्मास्य महामहोत्सवात स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की धर्माच्या नावावर फक्त धर्म असावा. कोणतंच ढोंग केलं जाऊ नये.