सांगली : भक्ष्याच्या शोधात धावतांना विहीरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल आठ तासानंतर सुखरुप बाहेर काढण्यात वन विभागाला शुक्रवारी यश आले. सात महिन्याच्या विहीरीतून बाहेर काढल्यानंतर वैद्यकीय तपासणी करुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.आप्पासो नेमगोंडा पाटील-शिरोटे (रा. ऐतवडे बुद्रुक ता. वाळवा) हे आज सकाळी शेतामध्ये विहीरीवरील पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहीरीत बिबट्या आढळून आला. पाण्यात विहीरीच्या खबदाडामध्ये हा बिबट्या होता. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वन विभागाला दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिबट्या विहीरीत पडल्याची माहिती मिळताच वन विभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांच्यासह भगवान गायकवाड, अनिल पाटील, भिवा कोळेकर, आश्‍विनी वाघमारे, निवास उगळे आदी वन कर्मचारी बचाव साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंजरा विहीरीत सोडून बिबट्याला सुरक्षित वर काढण्यासाठी क्रेनही मागविण्यात आली. क्रेनच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला बाहेर काढण्यात आले.यानंतर शिराळा येथील पशू वैद्यक तज्ञांकडून त्याची तपासणी करण्यात आली. कोणतीही दुखापत नसल्याने सायंकाळी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department succeeded in saving the leopard sangli amy