जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला सहशिक्षकासह दोघांनी मिळून चप्पलने मारहाण केल्याची घटना शहरातील देगाव येथे उर्दू शाळेत घडली. अ. रझाक करीम शेख असे मारहाण झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी शिक्षक जमील अ. गनी हिप्परगी व त्याच्यासोबतचा मैनोद्दीन शेख या दोघांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
देगाव येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत मुख्याध्यापक शेख हे कामकाज करीत असताना सहशिक्षक जमील हिप्परगी व त्याचा साथीदार मैनोद्दीन शेख हे दोघे मोटारसायकलवरून आले व त्यांनी बदलीच्या अर्जावर सही करण्यास सांगितले. तेव्हा मुख्याध्यापक शेख यांनी निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे सही करण्यास नकार देत, केंद्र प्रमुखाला भेटण्याचा सल्ला दिला. त्यामुळे संतापलेल्या दोघांनी मुख्याध्यापकाला शिवीगाळ करीत चप्पलने मारहाण केली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2014 रोजी प्रकाशित
सोलापुरात मुख्याध्यापकाला शिक्षकाकडून मारहाण
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला सहशिक्षकासह दोघांनी मिळून चप्पलने मारहाण केल्याची घटना शहरातील देगाव येथे उर्दू शाळेत घडली. अ. रझाक करीम शेख असे मारहाण झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
First published on: 12-04-2014 at 03:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Head beaten by the teacher in solapur