कर्जत : जामखेड शहरासह तालुक्यात आज, शनिवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे पूल वाहून गेले तर काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडली आहे. जामखेड- तुळजापूर रस्त्यावरील वाहतूकही बंद आहे. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा अतिवृष्टी झाली. पूर्वीच्याच अतिवृष्टीने मोठे नुकसान केले असताना पुन्हा अतिवृष्टीला सामोरे जावे लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जामखेड तालुक्यातील सातपैकी चार मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. तालुक्यात चोवीस तासांत सरासरी ७९.८ मिमी पाऊस झाला. त्यामध्ये साकत १२०, नायगाव १२०, खर्डा १२० व जामखेड ७० मिमी पाऊस झाला. तालुक्यात गेल्या आठवड्यातही अतिवृष्टी झाली. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा अतिवृष्टी झाली. पूर्वीच्याच अतिवृष्टीने मोठे नुकसान केले असताना पुन्हा अतिवृष्टीला सामोरे जावे लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अतिवृष्टीने नाहुली, भिलारे वस्ती येथील पूल वाहून गेला. दरडवाडी- आनंदवाडी पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बांधखडक येथील पूल वाहून गेला. त्यामुळे वस्ती व गावाचा संपर्क तुटला आहे. पिके पाण्यात केली आहेत. परिसरातील रस्तेही खचले आहेत. खैरी नदीला पूर आला आहे. राजुरी येथून पिंपळगाव आळवा, उंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने जामखेड तुळजापूर रस्ता पाण्याखाली गेला आहे. काही ठिकाणची शेती खरवडून वाहून गेली आहे.
राजुरी सरपंचाची तत्परता
राजुरी तलाव फुटण्याच्या मार्गावर असताना सरपंच सागर कोल्हे यांनी तातडीने भरपावसात पदरमोड करीत जेसीबीच्या साह्याने सांडवा खोलीकरण केले. त्यामुळे तलाव फुटण्याचा धोका टाळला.
नदीपात्रता अतिक्रमणे
तालुक्यात काही ठिकाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नदीपात्र लहान झाली आहेत. झाडेझुडपे वाढल्यानेही पाण्याच्या प्रवाहाला अडथळे आले आहेत. नदी ओढ्यामधील अतिक्रमण हटवणे आवश्यक झाले आहे.दरम्यान जामखेड तालुक्यातील सातपैकी चार मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. तालुक्यात चोवीस तासांत सरासरी ७९.८ मिमी पाऊस झाला. त्यामध्ये साकत १२०, नायगाव १२०, खर्डा १२० व जामखेड ७० मिमी पाऊस झाला. तालुक्यात गेल्या आठवड्यातही अतिवृष्टी झाली. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा अतिवृष्टी झाली. पूर्वीच्याच अतिवृष्टीने मोठे नुकसान केले असताना पुन्हा अतिवृष्टीला सामोरे जावे लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.