बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा अतीतटीची लढत होणार आहे. भावजय आणि नणंद एकमेकांविरोधात उभ्या ठाकण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. विविध गावात जाऊन सभा होऊ लागल्या आहेत. तसंच, एकमेकांना आव्हाने-प्रतिआव्हानेही दिले जात आहेत. आता बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना टोला लागवला आहे. एका सभेत त्या बोलत होत्या.

“मी तुमची लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही म्हणाल ते मी करायचं आहे. तुम्हाला महागाई, बेरोजगाई वाटते तर मी त्यावर बोललं पाहिजे. सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा. शेवटी आपल्या सुखदुखात कोण असेल अशाच लोकांना मतदान करा. मी जी मतं मागतेय ती मेरिटवर मागतेय. आणि मी मते मागतेय, सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाहीय. गाव-वाडी-वस्तीवर मी फिरतेय. आणि असंच असलं पाहिजे”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांना टोला लगावला.

हेही वाचा >> अजित पवारांनी वेगळा निर्णय का घेतला? जनतेला खुलं पत्र लिहित म्हणाले, “मला राजकारणात…”

माझं आणि सदानंद यांचं आती क्या खंडाला

“माझी खासदारकी ही माझी आहे. माझ्या नवऱ्याने लुडबूड करण्याची गरज नाही. तुमच्यासारखंच आहे माझं आणि सदानंद यांचं. आती क्या खंडाला. त्यांनी मुंबईतलं बघायचं आणि मी इथलं बघायचं. अशा लोकांना मतदान करा जो स्वतः सभागृहाच उभा राहिल”, असं आवाहनही त्यांनी केलं.

मी कॉपी करून पास होणार नाही

“माझा घराणेशाही नाही. २००९ मध्ये मी पहिली लोकसभा निवडणूक लढले. पण त्याआधी मी २ वर्षे मतदारसंघ फिरले. गाव-वाडी-वस्तीवर जाऊन लोकांशी संवाद साधळा. मी लोकप्रतिनिधी आहे, कॉपी करून पास नाही होणार. नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास होणार असं नाही. मी सुप्रिया सुळे आहे, स्वतः लिहेन आणि पास होईन, स्वतःच्या मेहनतीने”, असंही त्या म्हणाल्या.