अलिबाग: मुंबईतील रिझवी महाविद्यालयातील वर्षासहलीसाठी आलेल्या ४ विद्यार्थ्यांचा बडून मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील वावर्ले येथे असलेल्या छोट्या धरणात ही घटना घडली. रिझवी कॉलेजमधील ३७ विद्यार्थी खालापूर तालुक्यातील सोंडई येथे ट्रेकींगसाठी आले होते. ज्यात १७ मुलींचाही समावेश होता. ट्रेकींग आटोपल्यानंतर सर्वजण धावडी नदीवर असलेल्या छोट्या बंधाऱ्यावरील सांडव्यात डुंबण्यासाठी उतरले. मात्र वर्षासहलीचा आनंद लुटत असतांना यातील चार जण बुडाले.

हेही वाचा : सांगली: प्रेमी युगुलाची गळफास लावून आत्महत्या

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alibag 4 students of rizvi college mumbai drowned in khalapur at wavarle css
First published on: 21-06-2024 at 18:58 IST